कोण आहे विदेशी सिंगर जिला हार्दिक पांड्या करतोय डेट?, जस्मिन वालियाचा जन्म इंग्लंडमध्ये आणि थेट भारतात…

हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. हार्दिक पांड्या याने काही दिवसांपूर्वीच पत्नी नताशा हिच्यासोबत घटस्फोट घेतला. हेच नाही तर नताशा हिने घटस्फोट घेण्याच्या अगोदर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, लवकरच एक व्यक्ती रस्त्यावर येणार आहे.

कोण आहे विदेशी सिंगर जिला हार्दिक पांड्या करतोय डेट?, जस्मिन वालियाचा जन्म इंग्लंडमध्ये आणि थेट भारतात...
Hardik Pandya and Jasmin Walia
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 6:07 PM

भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्या हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला. हेच नाही तर घटस्फोटाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट झाला. हार्दिक आणि नताशा यांचा एक मुलगा देखील आहे. हार्दिक पांड्या याने नताशा हिला धोका दिल्याचे सांगितले जाते. नताशा हिने एक हैराण करणारी पोस्टही सोशल मीडियावर शेअर केली. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करत आम्ही दोघे सहमतीने घटस्फोट घेत असल्याचे म्हटले.

हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही तिच्या माहेरी सर्बियाला गेली. सोशल मीडियावर सतत नताशा ही फोटो शेअर करताना दिसत आहे. नताशा हिच्यासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या हा अनन्या पांडे हिला डेट करत असल्याची चर्चा रंगताना दिसली. यांचे काही व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, हार्दिक पांड्या हा नताशा नाही तर एका विदेशी गायिका डेट करत असल्याचे सांगितले जात आहे.

प्रसिद्ध ब्रिटिश गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत हार्दिक पांड्या याचे नाव जोडले जात आहे. हेच नाही तर नुकताच दोघांनी सुट्ट्या देखील एकत्र घालवल्याचे सांगितले जाते. हार्दिक पांड्या याने काही फोटो शेअर केले आहेत. त्याच सेम ठिकाणाहून जस्मिन वालिया हिने देखील फोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या आणि जस्मिन वालिया यांचे हे फोटो पाहून सर्वचजण हैराण झाले.

जस्मिन वालिया ही ब्रिटिश प्रसिद्ध गायिका आहे. जस्मिन वालिया हिचा जन्म इंग्लंडमध्ये झालाय. परंतू जस्मिन वालिया हिला खरी ओळख ही एका टीव्ही मालिकेपासून मिळालीये. 2014 मध्ये जस्मिन वालिया हिने आपले स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू केले. यानंतर तिने आपला मोर्चा हा सिंगिंगकडे वळवला. हेच नाही तर जस्मिन वालिया हिने बॉलिवूडचे एक गाणे देखील म्हटले.

जस्मिन वालिया हिने असिम रियाजसोबत एक गाणे देखील म्हटले आहे. जस्मिन वालिया ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओही शेअर करताना जस्मिन वालिया ही दिसते. जस्मिन वालिया हिचे नाव हार्दिक पांड्या याच्यासोबत जोडल्यापासून ती अधिकच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....