किती श्रीमंत आहेत सोनाक्षी सिन्हाचे सासरे? सलमान खानला देतात कर्ज आणि चक्क…
सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले आहे. हेच नाही तर लग्नाचे काही खास फोटोही सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाक्षी सिन्हा हिचा जबरदस्त असा लूक बघायला मिळतोय. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे.
सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. विशेष म्हणजे अनेक धमाकेदार भूमिका सोनाक्षी सिन्हा हिने केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. सोनाक्षी सिन्हा हिच्यावर सातत्याने टिका केली जातंय. सोनाक्षी सिन्हा हिच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. सोनाक्षी सिन्हाने नुकताच अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हाच्या या निर्णयाला सुरूवातीला तिच्या घरच्यांकडूनही विरोध करण्यात आला.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीरने काही वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कायमच दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसले. विशेष म्हणजे अभिनेता म्हणून जरी झहीर इक्बाल हा म्हणावा तेवढा यशस्वी नसला तरीही मोठ्या संपत्तीचा मालक झहीर इक्बाल आहे.
आता झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा ही रतनसी कुटुंबियांची सून झालीये. विशेष म्हणजे रतनसी कुटुंबाची मोठे नाव बिझनेसमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हा हिच्या सासऱ्याचे नाव इक्बाल रतनसी आहे. इक्बाल रतनसी यांना दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव झहीर इक्बाल आहे. झहीर एक अभिनेता आहे.
इक्बाल रतनसी हे प्रसिद्ध ज्वेलर्स आणि खूप मोठे व्यापारी आहेत. याशिवाय त्यांनी अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आपला पैसा गुंतवला आहे. हेच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपला पैसा लावला आहे. त्यांनी स्टेमॅक डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, ब्लॅक स्टोन हाउसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या देखील सुरू केल्या.
80 च्या दशकापासून सलमान खान आणि इक्बाल रतनसी यांची मैत्री अत्यंत खास आहे. इक्बाल रतनसी यांनी सलमान खानला खूप जास्त मदत केलीये. 1980 मध्ये सलमान खानला आर्थिक मदत देखील इक्बाल रतनसी यांनी केलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सलमान खानने थेट म्हटले होत् की, इक्बाल रतनसी हे माझी वैयक्तिक बँक आहे. झहीर इक्बाल यालाही सलमान खाननेच लाँच केले होते. सलमानच्या वाईट काळात इक्बाल रतनसी त्याच्यासोबत उभे होते.