गुलजार यांचं असली नाव माहीत आहे काय?; ज्ञानपीठ विजेत्या गीतकाराच्या नावाची का होतेय चर्चा?
Gulzar : गीतकार गुलजार साहब यांच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. आपले विचार अत्यंत कमी शब्दात मांडण्याची खरी कला ही गुलजार साहब यांच्याकडे आहे. गुलजार साहब यांचे शब्द थेट हृदयाला लागतात. गुलजार साहब यांचे गाणे लोकांच्या ओठावर असतात.
मुंबई : गुलजार साहब यांचे नाव कायमच चर्चेत असते. आपले विचार अत्यंत कमी शब्दात मांडण्याची खरी कला ही गुलजार साहब यांच्याकडे आहे. गुलजार साहब यांचे शब्द थेट हृदयाला लागतात. लोक कायमच गुलजार साहब यांचे नाव आदराने घेतात. गुलजार साहब यांनी आतापर्यंत अनेक हिंदी गाणी ही लिहिली आहेत. गुलजार साहब यांचे प्रत्येक गाणे लोकांच्या ओढावर असते. विशेष म्हणजे गुलजार साहब हे एक चांगले गीतकार असण्यासोबतच ते एक कवी देखील आहेत. गुलजार साहब यांना मानणारा एक मोठा वर्ष आहे.
गुलजार साहब यांना याच नावाने ओळखले जाते. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, गुलजार साहब यांचे खरे नाव हे गुलजार नाहीये. त्यांचे खरे नाव वेगळेच आहे. परंतू प्रत्येक व्यक्ती आज गुलजार याच नावाने त्यांना ओळखतो. 18 अगस्त 1934 मध्ये गुलजार साहब यांचा जन्म झाला. फाळणीनंतर गुलजार साहब हे अमृतसरमध्ये स्थायिक झाले.
शिक्षण दिल्ली येथे पूर्ण करून गुलजार साहब यांनी मायानगरी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यावर गुलजार साहब यांना मोठा संघर्ष करावा लागला. थेट एका गॅरेजमध्ये काम करण्याची वेळ गुलजार साहब यांच्यावर आली. 1963 मध्ये आलेला चित्रपट बंदिनीने गुलजार साहब यांना खरी ओळख ही मिळून दिली. या चित्रपटामधील एक गाणे त्यांनी लिहिले होते.
गुलजार साहब यांचे खरे नाव हे सम्पूर्ण सिंह कालरा आहे. मात्र, या नावाने फार लोक त्यांना ओळखत नाहीत. सम्पूर्ण सिंह कालरा हे गुलजार साहब यांचे नाव आहे, हे देखील बऱ्याच लोकांना अजूनही माहिती नाहीये. गुलजारचा अर्थ गुलाबी बाग असा आहे. गुलजार साहब यांना बंगाली भाषा वाचता आणि लिहिता देखील येते.
गुलजार साहब यांनी आपल्या करिअरच्या सुरूवातीच्या काळात एक मोठा संघर्ष नक्कीच केलाय. बिमल रॉयचे असिस्टेंट देबू सेन यांनी गुलजार साहब यांची मैत्री होती. गुलजार साहबला लिहिण्याची आवड असल्याने त्यांनी बिमल रॉयला भेटले. गुलजार साहब यांच्या गाण्याचे लोक आजही मोठे चाहते आहेत. गुलजार साहब यांचे जास्त फोटो कुर्ता आणि पायजम्यातच आहेत.