Janhvi Kapoor: “एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करणार का?”; एका झटक्यात जान्हवीने दिलं ‘हे’ उत्तर

"तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करणार का", असा अत्यंत खासगी प्रश्न त्याने जान्हवीला (Janhvi Kapoor) विचारला. करणच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता जान्हवीने उत्तर दिलं.

Janhvi Kapoor: एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करणार का?; एका झटक्यात जान्हवीने दिलं 'हे' उत्तर
Karan Johar and Janhvi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 2:00 PM

बॉलिवूड इंडस्ट्रीतील खास मैत्रिणी सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी नुकतीच ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या सर्वांत लोकप्रिय शोच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये या दोघी एकत्र झळकल्या होत्या. यावेळी करणने (Karan Johar) दोघींना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बरेच प्रश्न विचारले. “तुझा एक्स बॉयफ्रेंड हा तुझा एक्स का आहे?” असा प्रश्न त्याने साराला विचारला. तर “तू तुझ्या एक्स बॉयफ्रेंडसोबत सेक्स करणार का”, असा अत्यंत खासगी प्रश्न त्याने जान्हवीला (Janhvi Kapoor) विचारला. करणच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता जान्हवीने उत्तर दिलं.

“नाही, पुन्हा मागे जाणार नाही”, असं स्पष्ट उत्तर जान्हवीने करणला दिलं. याच एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवीने दोघा भावंडांना एकत्र डेट केल्याचा खुलासा करणने केला. “मी कोरोना महामारीपूर्वीची गोष्ट सांगतोय. तुमची मैत्री आता कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे हे मला माहित नाही, पण तुम्ही दोघींनी आधी दोन भावंडांना डेट केल्याचं मला माहितीये”, असं करण म्हणाला. करणकडून हा खुलासा होताच सारा आणि जान्हवी यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला. करण शोमध्ये याबद्दल काही बोलणार हे तुला माहित होतं का, असा प्रश्न त्या दोघी एकमेकांना विचारू लागतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

हा एपिसोड प्रसारित होताच चाहत्यांनी ती दोन भावंडं कोण होती, याचा शोध सुरू केला. काही फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले, ज्यातून हे स्पष्ट झालं की सारा आणि जान्हवीने दोन भावंडांना डेट केलं होतं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू वीर पहारियाँ आणि शिखर पहारियाँ यांना सारा-जान्हवीने डेट केल्याचं म्हटलं गेलं. या एपिसोडमध्ये सारा आणि जान्हवी या एकमेकींच्या मैत्रीबद्दल व्यक्त झाल्या. या दोघींच्या मैत्रीची सुरुवात कुठून झाली आणि कशा पद्धतीने मग दोघी एकमेकींसोबत फिरायला जाऊ लागले, याबद्दल त्यांनी सांगितलं.

लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?
लालपरीचा प्रवास महागणार, नव्या सरकारच्या काळात सामन्यांच्या खिशाला झळ?.
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'
'लिंबू-मिर्ची, काळी बाहुली अन् उलट्या पखाच कोंबड, फरक नाही पडला तर...'.
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला
काळजीवाहू CM गायब,अमावस्या-पौर्णिमेला कोणती शेती?,आदित्य ठाकरेंचा टोला.
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात
पाणी जपून वापरा... मुंबईसह 'या' भागात आजपासून 5 दिवस पाणीकपात.
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'
'लाडकी बहीण'वरून आढावांचा सवाल, 'महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या..'.
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव
पुन्हा मतमोजणी? EVM वर शंका अन् या 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव.
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई
शपथविधी ठरला, फडणवीस CM होणार पण गृहखात्यावरून टक्कर अन् 2 नंबरची लढाई.
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण
'EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण.
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मध्ये जुगाड? आता महाराष्ट्रातील या गावात होणार बॅलेट पेपरवर मतदान.
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी
'मी पुन्हा येईन..', 5 डिसेंबरला नव्या CM चा शपथविधी; भाजपची जंगी तयारी.