Koffee With Karan 7: लग्नानंतर रणबीर-आलिया पहिल्यांदा टीव्हीवर येणार एकत्र; करण जोहरने ‘या’ सेलिब्रिटींनाही केलं आमंत्रित

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan 7) हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. करणने याआधीच्या सिझनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना या शोमध्ये आमंत्रित केलं होतं. या शोमध्ये करण आणि सेलिब्रिटींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे.

Koffee With Karan 7: लग्नानंतर रणबीर-आलिया पहिल्यांदा टीव्हीवर येणार एकत्र; करण जोहरने 'या' सेलिब्रिटींनाही केलं आमंत्रित
लग्नानंतर रणबीर-आलिया पहिल्यांदा टीव्हीवर येणार एकत्रImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 10:30 AM

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan 7) हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. करणने याआधीच्या सिझनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना या शोमध्ये आमंत्रित केलं होतं. या शोमध्ये करण आणि सेलिब्रिटींमध्ये रंगलेल्या गप्पा पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. पडद्यावरील आणि पडद्यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा हे सेलिब्रिटी या शोमध्ये करायचे. याच शोमध्ये करणचा कंगना रनौतशी वाद झाला होता. ज्यानंतर तिने करणवर घराणेशाहीचा आरोप केला होता. आता या चॅट शोचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॉफी विथ करण’चा सातवा सिझन लाँच होणार असून या सिझनमध्ये उपस्थित राहणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे. या यादीत करणची सर्वांत आवडती जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सर्वांत अग्रस्थानी आहेत. लग्नानंतर ही जोडी पहिल्यांदाच टीव्हीवर एकत्र झळकणार असल्याचं म्हटलं जातंय.

‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, करण जोहरचा हा लोकप्रिय शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या सिझनमध्ये सहभागी होणारे सेलिब्रिटी कोण असतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. रणबीर-आलियाने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नुकतीच लग्नगाठ बांधली. या मोजक्या पाहुण्यांमध्ये करणचाही समावेश होता. सध्या बॉलिवूडमध्ये ही सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी असल्याने करण सर्वांत आधी या दोघांनाच आमंत्रित करणार असल्याचं समजतंय.

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

सध्या करण जोहर त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातील महत्त्वाचा भाग मे महिन्यात शूट होणार आहे. त्यामुळे मे महिन्यानंतर करण त्याच्या चॅट शोची तयारी करणार आहे. या चॅट शोच्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू झालं असून मे महिन्यातच शूटिंगलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरपर्यंत स्टार नेटवर्कवर हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. रणबीर आणि आलियाशिवाय यामध्ये कियारा अडवाणी, विकी कौशल, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सिद्धांत चतुर्वेदी, सिद्धार्थ मल्होत्रा, अनिल कपूर यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा सहभागी होणार असल्याचं कळतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.