Koffee With Karan: तारुण्याचं रहस्य काय विचारताच अनिल कपूर म्हणाले, सेक्स..सेक्स..सेक्स

कॉफी विथ करणच्या 11 व्या एपिसोडची सुरुवात करण जोहरच्या प्रश्नाने होते. शोचा सूत्रसंचालक करण हा अनिल कपूर यांना प्रश्न विचारतो. "अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला तरुण असल्यासारखं जाणवतं", असा प्रश्न तो अनिल यांना विचारतो.

Koffee With Karan: तारुण्याचं रहस्य काय विचारताच अनिल कपूर म्हणाले, सेक्स..सेक्स..सेक्स
Koffee With Karan Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 2:40 PM

कॉफी विथ करणचा (Koffee With Karan) यंदाचा सातवा सिझन तुफान गाजतोय. आतापर्यंत या सिझनचे दहा एपिसोड पार पडले आहेत. आलिया भट्ट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, करीना कपूर, सैफ अली खान, शाहिद कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी आतापर्यंत या टॉक शोमध्ये हजेरी लावली. आता नव्या एपिसोडमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरुण धवन (Varun Dhawan) हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. हा एपिसोड खूपच मनोरंजक असणार, असं या प्रोमोवरून दिसतंय.

कॉफी विथ करणच्या 11 व्या एपिसोडची सुरुवात करण जोहरच्या प्रश्नाने होते. शोचा सूत्रसंचालक करण हा अनिल कपूर यांना प्रश्न विचारतो. “अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत, ज्यामुळे तुम्हाला तरुण असल्यासारखं जाणवतं”, असा प्रश्न तो अनिल यांना विचारतो. यावर उत्तर देताना अनिल कपूर म्हणतात, “सेक्स, सेक्स आणि सेक्स”. हे ऐकून करण जोहर आणि वरूण धवन हे पोट धरून हसू लागतात. “हे सगळं स्क्रीप्टेड आहे”, असंही ते पुढे म्हणतात.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या एपिसोडमध्ये वरुण धवनलाही विविध प्रश्न विचारले जातात. “कतरिना कैफ की दीपिका पदुकोण, दोघींपैकी कोणासोबत काम करू इच्छितो?”, असा प्रश्न करण वरुणला विचारतो. त्यावर वरुण म्हणतो, “मी लहान मुलासारखा दिसतो, असं म्हटलं जातं.” हे ऐकून करण त्याला प्रतिप्रश्न करतो, “मग तुला असं वाटतं का की त्या दोघी तुझ्यापेक्षा मोठ्या दिसतात?” अखेर स्वत:चा बचाव करत वरुण म्हणतो, “असं तू म्हणतोयस, मी नाही”.

प्रश्नोत्तरांचा हा सिलसिला इथेच थांबला नाही. करणने पुढे वरुणला तीन प्रश्न विचारले. “सर्वांत जास्त गप्पा मारायला कोणाला आवडतं, सर्वाधिक चुकीच्या स्क्रीप्ट कोण निवडतं आणि अनोळखी व्यक्तींशी छेडछाड करण्याची कोणाची सवय आहे”, असं करण विचारतो. या तिन्ही प्रश्नांचं उत्तर देताना वरुण अभिनेता अर्जुन कपूरचं नाव घेतो. या एपिसोडच्या प्रोमोच्या शेवटी अनिल कपूर आणि वरुण धवन यांच्या डान्स फेस-ऑफसुद्धा पहायला मिळतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.