Koffee With Karan 7: करणने ठेवलं समंथाच्या मर्मावर बोट; लग्नाविषयी प्रश्न विचारताच म्हणाली..

या एपिसोडचा टीझर करणने सोशल मीडियावर पोस्ट करताच ट्विटरवर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.

Koffee With Karan 7: करणने ठेवलं समंथाच्या मर्मावर बोट; लग्नाविषयी प्रश्न विचारताच म्हणाली..
Karan Johar and SamanthaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 19, 2022 | 2:02 PM

कॉफी विथ करण (Koffee With Karan 7) या सर्वांत लोकप्रिय चॅटचा सातवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनचे दोन एपिसोड्स आतापर्यंत प्रसारित झाले असून तिसऱ्या एपिसोडचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) तिसऱ्या एपिसोडमध्ये एकत्र झळकणार आहेत. या एपिसोडचा टीझर करणने सोशल मीडियावर पोस्ट करताच ट्विटरवर त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. समंथाला उचलून अक्षय हा कॉफी विथ करणच्या सेटवर पोहोचतो. ही अनोखी एंट्री आणि दोघांमधील मजामस्करी पाहून चाहते हा एपिसोड पाहण्यासाठी आतूर झाले आहेत.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने निवेदक ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्याची घटना चांगलीच गाजली होती. त्याचाच संदर्भ घेत करण अक्षयला प्रश्न विचारतो. “ख्रिस रॉकने टीनाबद्दल विनोद केला तर तू काय करशील”, असं करण विचारतो. यावर उत्तर देताना अक्षय म्हणतो “मी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे देईन.” पत्नीच्या टक्कलची खिल्ली उडवल्याने विल स्मिथने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात मंचावर जाऊन ख्रिसच्या कानशिलात लगावली होती.

हे सुद्धा वाचा

पहा एपिसोडचा प्रोमो-

या एपिसोडमध्ये करण समंथाच्या लग्नाबद्दलही बोलताना दिसतो. त्यावर समंथा त्याला थांबवत म्हणते, “दुःखी विवाहासाठी तू कारणीभूत आहेस.” मात्र समंथा हे कोणत्या संदर्भात बोलते हे एपिसोड पूर्ण पाहिल्यावरच समजू शकेल. “जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडची बॅचलर पार्टी होस्ट करायची असेल, तर तू कोणत्या दोन बॉलिवूड अभिनेत्यांना डान्स करायला आमंत्रित करशील”, असाही प्रश्न तो समंथाला विचारतो. त्यावर फार विचार न करता समंथा पटकन म्हणते “रणवीर सिंग आणि रणवीर सिंग.”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

अक्षय आणि समंथा यांच्यातील केमिस्ट्रीही नेटकऱ्यांना खूप आवडली. हा एपिसोड खूपच चांगला असेल, अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. तर काहींनी प्रोमो पाहताच हा कॉफी विथ करणचा सर्वांत हिट एपिसोड असेल, असा अंदाज वर्तवला आहे. या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट-रणवीर सिंग आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये सारा अली खान-जान्हवी कपूर यांची हजेरी लावली होती.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.