“तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..”; वादावर काय म्हणाली अंकिता?

अंकिता वालावलकरने सूरज चव्हाणसोबतच्या वादावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिने सर्वकाही स्पष्ट केलं आहे. त्याचसोबत या विषयावर यापुढे काहीच बोलणार नसल्याचंही तिने म्हटलंय.

तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो बाहेर आल्यावर तसा नाही..; वादावर काय म्हणाली अंकिता?
अंकिता वालावलकर, सूरज चव्हाणImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 9:11 AM

‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सिझन संपला असला तरी त्यातील स्पर्धक वेगवेगळ्या कारणांमुळे सतत सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजेच अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यातील वाद चर्चेत आला आहे. नुकतीच अंकिता सूरजला भेटायला त्याच्या गावी गेली होती. तेव्हा तिथे तिला मिळालेली वागणूक आणि त्यानंतर सूरजच्या अकाऊंटवरून तिचे काढून टाकण्यात आलेले फोटो, व्हिडीओ यांवरून नेटकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या वादादरम्यान अंकिताने ‘माझ्याकडून यापुढे कोणत्याही अपेक्षा नसाव्यात’ असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता अंकिताने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सूरजसोबतच्या वादावर सविस्तरपणे बोलली आहे. हा नेमका वाद काय आहे, सूरजविषयी तिला काय वाटतं याबद्दल ती यात मोकळेपणे व्यक्त झाली. यात तिने सूरजसोबत फोनवर झालेल्या संवादाचाही व्हिडीओ पोस्ट केला आहे. सूरज खूप भोळा आहे आणि त्याच्या आजूबाजूचे लोक या भोळेपणाचा फायदा घेत आहेत, असं अंकिताने म्हटलंय.

काय म्हणाली अंकिता?

“हा व्हिडीओ बनवण्यामागचं कारण एकच आहे की सूरजला मी 70 दिवस ओळखते, बिग बॉसमध्ये आमचा एकत्र प्रवास झालाय. तो मुलगा अतिशय भोळा आहे, त्याला काही कळत नाही. मी त्याला याच गोष्टीसाठी नॉमिनेट करत होते की त्याला त्याचं मत मांडता येत नाही. त्याच गोष्टीमुळे आज त्याला होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, त्यात मला अडकवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, तो मला सहन होण्यापलीकडे झालाय. सूरजवर कोणीही काहीही राग ठेवू नका. त्या मुलाला जसं सांगितलं जातं तसं तो करतोय. मला याची गॅरंटी आहे की त्याला असं सांगितलं असणार की अंकिताने तुझ्याबद्दल काहीतरी वाईट फिरवलंय. त्यामुळे त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका.”

“सूरजला मी नॉमिनेट करायचे यावरून बाहेर काय व्हायचं हे मला आतमध्ये असताना माहीत नव्हतं. बाहेर आल्यावर मला कळलं की त्यामुळे लोकांना राग यायचा. पण मी त्याला याच निकषांवर नॉमिनेट करायचे की त्याला मत मांडता येत नाही. ते तुम्हाला आता कळत असेल. आपलं मत मांडता येत नसल्याने तो कुठेतरी फसला जातोय आणि मलाय नकोय की तो फसला जावा. या सगळ्या गोष्टीवर माझी एक मला एकच सांगते की शांत बस. पण जेवढं मी शांत बसते, तेवढे हे असे प्रकार होतात.”

हे सुद्धा वाचा

“प्रत्येक वेळी बोललं जातं की कुठेय ती, ती तर फेमस होण्यासाठी करतेय, ती का नाही आली? सूरजच्या गोष्टींमध्ये जेवढं मी लक्ष देण्याचा प्रयत्न करते, तेवढं मला बाजूला केलं जातं. माझं सगळं व्यवस्थित चालू आहे. माझं सतत शूटिंग सुरू आहे, मी सतत ट्रॅव्हल करतेय. एवढं काम माझ्याकडे असताना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाही. ही प्रसिद्धीसाठी करतेय, असं म्हटलं गेलं तेव्हा मी दुर्लक्ष केलं. सूरजच्या जीवावर काही जणांचे बरेच युट्यूब चॅनल चालतायत. ते प्रत्येक वेळी मला टारगेट करतायत.”

“सूरजच्या घरी तू उशिरा का गेली, असा सवाल करण्यात आला होता. ज्याला त्याला जसा वेळ मिळतोय, तसा तो त्याच्या गावी जाऊन भेटतोय. मी तर आताही जाणार नव्हते, मला खूप उशिरा जायचं होतं. पण त्याचा फोन आला की सगळे आले आणि तू का आली नाहीस? हेसुद्धा त्याला कोणीतरी बोलायला लावलं होतं. तरी त्याने फोन केला म्हणून मी गेले. तुम्ही त्या मुलाचा ज्या पद्धतीने वापर करून घेत आहात, ते मला अजिबात पटलेलं नाही. अंकिता गप्प बसली म्हणजे ती चुकीची आहे असा अर्थ होत नाही. मला त्या सगळ्याच पडायचं नव्हतं, म्हणून मी गप्प होते.”

“मी महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छिते की तुम्ही ज्या सूरजवर प्रेम केलंत, तो सूरज बाहेर आल्यावर तसा नाहीये. तो गणपतीच्या मूर्तीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो घडेल. तो स्वत:चं मत मांडत नाही. त्याच्या आजूबाजूचे लोक चुकीच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. कारण ते त्यांच्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करत आहेत. मला जेवढं शक्य होईल, तेवढं माझं सूरजवर लक्ष राहील, पण या दलदलीत मला पडायचं नाही. माझ्याकडे माझी खूप कामं आहेत. मी नको असेन तर बाजूला होईन, पण त्यासाठी एवढं सगळं करू नका. त्या मुलाला चुकीचं मार्गदर्शन करू नका. देवाने त्याला जे दिलंय, ते टिकू दे आणि वाढू दे अशी माझी इच्छा आहे. त्याच्या जीवावर इतर सगळेजण मोठे झाले तर ते मला खूप वाईट वाटेल” असं अंकिता म्हणाली.

हा सगळा वाद झाल्यानंतर सूरजने अंकिताला फोन केला होता. याचाही व्हिडीओ तिने पुढे पोस्ट केला आहे. त्यात सूरज अंकिताला म्हणतो, “माझ्या अकाऊंटचा आयडी आणि पासवर्ड मी माझ्याकडे घेतो. मी तुला कशाला नाराज करू? बिग बॉसच्या घरातील टीमवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला तुम्ही समजून घ्या.”  या व्हिडीओच्या अखेरीस अंकिता तिचं मत मांडते. “सूरज हा अतिशय भोळा आहे. त्याला काहीच माहीत नाही. दिवसभरात त्याने हातात मोबाइलसुद्धा घेतला नव्हता. त्याला मोबाइल दुसऱ्या व्यक्तीकडे असतो, तिसरी व्यक्ती त्यावर व्हिडीओ एडिट करत असते. यानंतर या विषयावर मी काही बोलणार नाही,” असंही ती स्पष्ट करते.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.