लग्नाआधीच प्रेग्नेंट; घटस्फोटानंतर 7 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात; राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली बॉलिवूड अभिनेत्रीची लव्ह लाइफ फारच चर्चेत

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या अभिनेत्रीने अनेक हीट चित्रपट दिले मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती तिच्या खाजगी आयुष्याची. लग्नाआधी प्रेग्नंट ते लहान अभिनेत्याला डेट करण्यापर्यंतच्या चर्चा रंगल्या.

लग्नाआधीच प्रेग्नेंट; घटस्फोटानंतर 7 वर्ष लहान अभिनेत्याच्या प्रेमात; राष्ट्रीय पुरस्कार मिळालेली बॉलिवूड अभिनेत्रीची लव्ह लाइफ फारच चर्चेत
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 6:10 PM

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या चित्रपटांपेक्षाही खाजगी आयुष्याची फारच चर्चा झालेली पाहायला मिळाली. त्यांच्या आयुष्यातील अफेअर्स, घटस्फोट ते झालेले अनेक रिलेशनशिप या सर्वांबद्दलच्या चर्चा आजही होताना दिसतात. अशी एक अभिनेत्री आहे जिच्या लव्ह लाइफबद्दल सर्वाधिक चर्चा झालेली पाहायला मिळाली आहे.

हीट चित्रपट अन् राष्ट्रीय पुरस्कार

ही अभिनेत्री बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री असून तिने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. एवढच नाही तर तिला दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.  पण तरीही तिच्या खाजगी आयुष्याबद्दलच्या चर्चा जास्त रंगल्या. ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे कोंकणा सेन शर्मा

या अभिनेत्रीने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांतून तिने आपला ठसा उमटवलाय.  1983 साली ‘इंदिरा’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाने  बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात तिने प्रवेश केला. 2001 मधील ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ या इंग्रजी चित्रपटातून तिने प्रसिद्धी मिळवली. या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. 2007 मध्ये ‘ओंकारा’मधूनही कोंकणा इंदूची भूमिका करून चर्चेत आली होती. या पात्रासाठी कोंकणाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

View this post on Instagram

A post shared by Konkona Sensharma (@konkona)

लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याच्या चर्चा

2007 मध्ये तिने रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यानंतर कोंकणा आणि रणवीरने सप्टेंबर 2010 मध्ये लग्न केलं.मार्च 2011 मध्ये कोंकणा सेन शर्माने एका मुलाला जन्म दिला, त्याचं नाव हारून आहे.

मात्र, दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. कोंकणा सेन शर्मा आणि रणवीर शौरी यांनी 10 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 2020 मध्ये एकमेकांशी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेण्यापूर्वीच दोघेही वेगळे राहू लागले होते.

7 वर्ष लहान अभिनेत्यावर प्रेम

कोंकणाचा मुलगा आज 13 वर्षांचा आहे. काही काळापूर्वीच कोंकणा सेन सात वर्ष लहान अमोल पराशर रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी आली होती. मात्र त्यावेळी दोघांनीही याबाबत कोणतेही भाष्य केलं नाही. दोघांनीही ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.

शिवाय कोंकणा  Androgyny असल्याचंही तिने सांगितले आहे. कोंकणा  प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अपर्णा सेन यांची कन्या असून कोंकणाची एकूण संपत्ती ही 5 दशलक्षच्या घरात असल्याचं म्हटलं जातं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.