AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या पथकावर हल्ला, पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणते…

मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर जमावाने हल्ला चढवला होता

NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या पथकावर हल्ला, पत्नी-अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणते...
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 5:56 PM

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास करणाऱ्या एनसीबी पथकावर काल मुंबईत हल्ला झाला होता. या पथकाचे नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. समीर व्यवस्थित असल्याचं सांगत क्रांतीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील सर्व अधिकाऱ्यांना सलाम ठोकला. (Kranti Redkar salutes NCB Team after husband Sameer Wankhede mobbed while arresting Drug Peddler)

“शुभेच्छा आणि काळजीसाठी तुम्हा सर्वांचे आभार. समीर वानखेडे ठीक आहेत. आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्यासोबत कणखर उभे आहोत. खंबीरपणे उभे राहून लढा देणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील सर्व अधिकाऱ्यांना सलाम. तुम्ही आज आणि नेहमीच आमची मान अभिमानाने उंचावता” अशा भावना क्रांतीने व्यक्त केल्या आहेत.

मुंबईतील गोरेगाव परिसरात ड्रग्ज पेडलर्सला पकडण्यासाठी गेलेल्या NCB च्या पथकावर जमावाने हल्ला चढवला होता. यात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह टीममधील पाच जणांचा समावेश होता. या घटनेत एनसीबीचे दोन अधिकारी जखमी झाले.

नेमकं काय घडलं?

एनसीबीचे पथक मुंबईतील गोरेगाव परिसरात कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सकडे छापेमारीसाठी गेले होते. त्यावेळी अचानक 50 ते 60 जणांच्या जमावाने गर्दी करत एनसीबीच्या पथकाला घेराव घालत हल्ला केला. कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने समीर वानखेडे आणि त्यांची संपूर्ण टीम हादरली. या हल्ल्यात एनसीबीचे विश्वविजय सिंह आणि शिवा रेड्डी असे दोन अधिकारी जखमी झाले. या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या मदतीने या ठिकाणची स्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे. हल्ला झालेल्या ठिकाणाहून कॅरी मेंडिस नावाच्या ड्रग्ज पेडलर्सला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

संबंधित बातम्या :

ड्रग्ज पेडलर्सचं डेअरिंग वाढलं, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंसह NCB च्या पथकावर हल्ला

भल्या पहाटे धाड टाकून सॅम्युएल मिरांडाला उचललं, रियाच्या घरी पोहोचलेला NCB चा अधिकारी मराठी अभिनेत्रीचा पती

(Kranti Redkar salutes NCB Team after husband Sameer Wankhede mobbed while arresting Drug Peddler)

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.