Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तिला कॅन्सर नव्हताच, डॉक्टरांच्या चुकीमुळे..’; 21 वर्षीय मुलीला गमावल्यानंतर निर्मात्याच्या पत्नीचा खुलासा

अभिनेते आणि निर्माते कृष्ण कुमार यांची 21 वर्षीय मुलगी टिशा कुमारचं 18 जुलै रोजी निधन झालं होतं. कृष्ण कुमार हे ‘टी-सीरिज’चे गुलशन कुमार यांचे बंधू आणि भूषण कुमार यांचे काका आहेत. टिशावर जर्मनीत उपचार सुरू होते.

'तिला कॅन्सर नव्हताच, डॉक्टरांच्या चुकीमुळे..'; 21 वर्षीय मुलीला गमावल्यानंतर निर्मात्याच्या पत्नीचा खुलासा
कृशन कुमार आणि त्यांची दिवंगत मुलगी टिशा कुमारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 12:05 PM

अभिनेते आणि निर्माते कृशन कुमार यांच्या 21 वर्षीय मुलीचं जुलै महिन्यात कॅन्सरने निधन झालं होतं. टिशा असं त्यांच्या मुलीचं नाव होतं. आता टिशाच्या निधनाच्या चार महिन्यानंतर तिची आई तान्या सिंहने सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. इतकंच नव्हे तर ‘माझ्या मुलीचं निधन कॅन्सरने झालं नाही’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. मुलीविषयी लिहिताना त्यांनी वैद्यकिय यंत्रणांवरही निशाणा साधला आहे. तान्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात टिशा दिसून येत आहे. मुलीसोबत त्यांनी आनंदात घालवलेले क्षण या व्हिडीओत पहायला मिळतंय. टिशा ही खूपच आनंदी, खुश राहणारी, पाळीव प्राण्यांवर प्रेम करणारी आणि जवळच्या व्यक्तींसोबत हसत-खेळत राहणारी होती, असं यातून दिसून येतंय.

तान्या सिंह यांची पोस्ट-

‘कसं, काय आणि का.. नेमकं काय घडलं हे विचारण्यासाठी अनेकजण मला मेसेज आणि कॉल करत आहेत. सत्य हे व्यक्तिनिष्ठ आणि व्यक्तीसापेक्ष आहे. जेव्हा एखादा शुद्ध, निष्पाप जीव एखाद्याच्या किंवा दुसऱ्यांच्या वाईट कृत्यांमुळे अन्यायाला बळी पडतो, तेव्हा गोष्टी गुंतागुंतीच्या आणि गोंधळात टाकणाऱ्या होतात. अचानक या सर्व गोष्टींना खूप उशीर झालेला असतो. पण शेवटी कर्माच्या परिणामांपासून आणि दैवी न्यायापासून कोणीही सुटू शकत नाही. मी याआधीच्या पोस्टमध्येही म्हटलंय की, कधीकधी संपूर्ण अस्तित्व तुमच्या स्वत:च्या नव्हे तर दुसऱ्यांच्या वाईट कृत्यामुळे हिरावून घेतलं जातं. मग कोणतंही दुसरं तत्त्वज्ञान याबद्दल काहीही म्हटलं तरी, वैद्यकीय (चुकीचे) निदान आणि वैद्यकिय (गैर) प्रकार यांचा कितीही व्यवसाय असला तरी, वाईट नजर, काळी जादू, नजर यांसारख्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नसला तरी सत्य हे बदलू शकत नाही. इतर कोणाला काय वाटतं याने सत्याला काही फरक पडत नाही. कारण जे तुम्हाला माहित आहे ते इतर कोणालाच माहित नाही. योग्य वेळ आली की सत्य स्वत:हून सर्वांसमोर येईल आणि ते नक्कीच एकेदिवशी होईल’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय.

हे सुद्धा वाचा

उपचार करणाऱ्यांवर आरोप करत त्यांनी पुढे म्हटलंय, ‘काहीही झालं तरी माझी मुलगी टिशा कधीच भीती किंवा नैराश्याला बळी पडली नाही. ती सर्वांत धाडसी मुलगी होती. हीच गोष्ट तिला तिच्या वयाच्या, लहान किंवा मोठ्या मुलांपर्यंत पसरवायची होती, की वैद्यकीय निदानाने घाबरून जाऊ नका. कारण तिला माहित होतं की शरीर हे जैविक आहे आणि निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची आहे. चुकीच्या निदानावर मात करण्याच्या तिच्या अनुभवातून आणि बायोमेडिसीनसह केमोचे परिणाम भोगताना तिला जगात हा संदेश पोहोचवायचा होता. सत्य हे आहे की माझ्या मुलीला कॅन्सर झालाच नव्हता. पंधरा वर्षांची असताना तिला एक लस दिली होती आणि त्यामुळे कदाचित ऑटोइम्युनची स्थिती निर्माण झाली असावी, ज्याचं चुकीचं निदान झालं होतं. त्यावेळी आम्हाला याविषयी काहीच माहित नव्हतं.’

या पोस्टमध्ये तान्या यांनी इतर पालकांनाही आवाहन केलं आहे. ‘पालकांनो, जर तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या ‘लिम्फ नोड्स’ना सूज आली असेल तर कृपया बोन मॅरो चाचणी किंवा बायोप्सी करण्यापूर्वी दुसरं-तिसरं मत जाणून घ्या. लिम्फ नोड्स हे शरीराचे संरक्षक असतात आणि ते भावनिक आघात किंवा पूर्णपणे उपचार न केलेल्या जुन्या संसर्गामुळेही सुजू शकतात. ही सर्व माहिती आम्हाला मिळण्यापूर्वीच आम्ही वैद्यकीय सापळ्यात अडकलो होतो. मी दररोज प्रार्थना करते की कोणत्याही मुलाला कधीही वैद्यकीय सापळ्यांच्या किंवा लपलेल्या नकारात्मक शक्तींच्या क्रूर जगाचा सामना करावा लागू नये.’

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.