Krishna Abhishek | मामा गोविंदाच्या आठवणीमध्ये भावूक झाला कृष्णा अभिषेक, सांगितला जुन्या मोठा किस्सा
कृष्णा अभिषेक याने काही दिवसांपूर्वीच द कपिल शर्मा याच्या शोमध्ये पुनरागमन केले आहे. चाहते कृष्णा अभिषेक याचा वाट पाहत होते. कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यामधील वाद सर्वांनाच माहिती आहे. गोविंदासाठी खास एक पोस्ट कृष्णा अभिषेक याने शेअर केलीये.
मुंबई : कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krishna Abhishek) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर कॉमेडियन कृष्णा अभिषेक याने द कपिल शर्माच्या शोमध्ये (The Kapil Sharma Show) पुनरागमन केले आहे. कृष्णा अभिषेक आणि कपिल शर्मा यांच्यामध्ये काहीतरी वाद झाल्याने कृष्णा अभिषेक याने शो सोडला होता. मात्र, चाहते हे सतत कृष्णा अभिषेक याला मिस करताना दिसत होते. शेवटी कृष्णा अभिषेक याने द कपिल शर्मा शोमध्ये धमाकेदार पध्दतीने पुनरागमन केले. कृष्णा अभिषेक हा परत आल्याने चाहत्यांमध्येही उत्साह हा बघायला मिळतोय. कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्या शोमध्ये नेहमीच बाॅलिवूडचे कलाकार हे त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचतात.
कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा अर्थात बाॅलिवूड अभिनेता गोविंदा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद हा बघायला मिळतोय. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना गोविंदा हा जाहिरपणे म्हणाला की, होय मी कृष्णा अभिषेक याच्यावर नाराज आहे. मात्र, मला कुटुंबातील काही गोष्टी अशा जाहिरपणे बोलण्यास आवडत नाहीत.
इतकेच नाही तर कृष्णा अभिषेक याच्या आई वडिलांबद्दल बोलताना देखील गोविंदा हा दिसला होता. नुकताच कृष्णा अभिषेक याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मामाला मिस करत असल्याचे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. कृष्णा अभिषेक याने डान्सचा व्हिडीओ हा शेअर केला आहे. आता कृष्णा अभिषेक याची पोस्ट व्हायरल होत आहे.
कृष्णा अभिषेक याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी शूटिंगच्या सेटवर मामा गोविंदासोबत नेहमीच जात होतो. त्यावेळी माझे मामा अभिनय आणि डान्स करायचे. ते पाहून मला खूप छान वाटत होते विशेष म्हणजे आता ते करताना देखील मला खूप भारी वाटते.
मामा गोविंदा याच्यासोबत वाद चालत असताना कृष्णा अभिषेक हा नेहमीच गोविंदाबद्दल बोलताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्मा याच्या शोमध्ये बोलताना कृष्णा अभिषेक हा गोविंदाबद्दल बोलताना दिसला होता. विशेष म्हणजे कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा आणि गोविंदाची पत्नी सुनीता यांच्यामध्ये काहीतरी वाद असल्याचे बोलले जाते.