Adipurush सिनेमा शाळेतील मुलांना दाखवण्यासाठी क्रिती सनॉन हिने घेतला मोठा नर्णय

शाळेतील मुलांना आणि त्यांच्या पालकांनी 'आदिपुरुष' सिनेमा दाखवण्यासाठी क्रिती सनॉन हिची धडपड; अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय... सध्या सर्वत्र 'आदिपुरुष' सिनेमाची चर्चा...

Adipurush सिनेमा शाळेतील मुलांना दाखवण्यासाठी क्रिती सनॉन हिने घेतला मोठा नर्णय
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 3:07 PM

मुंबई : अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेता प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमाला सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सिनेमाला विरोध होत असला तरी ‘आदिपुरुष’ने फक्त पाच दिवसांमध्ये २४७.८० कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. सोमवारी सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला होता. असं असताना देखील सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये १२६.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर तेलुगू व्हर्जनमध्ये सिनेमाने ११५.५५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सिनेमाला कडाडून विरोध होत असला तरी, सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा कमाई करताना दिसत आहे. याच दरम्यान क्रितीने दिल्ली मल्‍टीप्‍लेक्‍सचा एक शो बूक केला आहे… क्रिती तिच्या कुटुंबीयांना आणि शाळेच्या मुलांना हा सिनेमा दाखवण्यासाठी मल्‍टीप्‍लेक्‍सचा एक शो बूक केला असल्याचं म्हटलं जात आहे. क्रितीने ‘आदिपुरुष’मध्ये आई जानकीची भूमिका साकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने २१ जून रोजी दिल्ली येथे मल्‍टीप्‍लेक्‍सचा एक शो बूक केला आहे. या स्पेशल स्क्रीनिंगसाठी ती दिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरमच्या विद्यार्थ्यांना सोबत जाणार आहे. आदिपुरुष ‘रामायण’ या महाकाव्यावर आधारित आहे आणि मुलांनी ते विशेषतः पहावं, असं कृतीचं मत आहे. क्रिती सेनॉनचे कुटुंबीयही या स्क्रिनिंगला उपस्थित राहणार असल्याची चर्चा रंगत आहे.

सूत्रींनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिनिंगसाठी किती विद्यार्थी उपस्थित पाहतील याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण थिएटर ३०० सीटचा आहे. यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहतील अशी चर्चा वर्तवण्यात येत आहे. याच दरम्यान क्रिती विद्यार्थांसोबत संवाद देखील साधणार आहे. स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान कोणताही अडथळा येवू नये म्हणून मल्टीप्लेक्स टीम पूर्ण तयारी करत आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत राहणाऱ्या क्रिती सनॉचं अजूनही शाळेशी असलेलं नातं घट्ट आहे. फक्त आदिपुरुष नाही तर क्रितीने अभिनेता वरुण धवन याच्यासोबत ‘भेडीया’ सिनेमाचं प्रमोशन देखील शाळेत केलं होतं. याशिवाय क्रितीने एका व्हिडिओ मेसेजमध्ये शाळेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदनही केले होते.

सिनेमा देशभरात तब्बल ६ हजार २०० पेक्षा अधिक स्क्रिनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ हजारांपेक्षा जास्त स्क्रिनवर सिनेमा हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षक देखील नाराजी जाहिर करत आहेत. तर सिनेमातील डायलॉगवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. अशात सिनेमा आणखी किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.