Kriti Sanon | क्रिती सनॉन हिने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर ‘या’ व्यक्तीला केला पहिला फोन, चक्क अभिनेत्री म्हणाली, मी त्यावेळी
क्रिती सनॉन हिने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट केले आहेत. क्रिती सनॉन हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. क्रिती सनॉन ही साऊथ अभिनेता प्रभास याला डेट करत असल्याची तूफान चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती.
मुंबई : नुकताच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या (National Award 2023 ) विजेत्यांची घोषणा करण्यात आलीये. या पुरस्कारांमध्ये काही मोजक्याच चित्रपटानी धमाका केल्याचे देखील बघायला मिळाले आहे. विशेष म्हणजे या पुरस्कारामध्ये बाॅलिवूड (Bollywood) आणि साऊथच्या चित्रपटांनी धमाल केलीये. अनेक बाॅलिवूड कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत. या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांकडे चाहत्यांच्या नजरा या सुरूवातीपासूनच होत्या. द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला देखील पुरस्कार मिळालाय.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बेस्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि कंगना राणावत यांचे नाव जोरदार चर्चेत होते. मात्र, या पुरस्कारांमध्ये कंगना राणावत हिला अत्यंत मोठा धक्का बसला. कंगनाच नाही तर तिच्या चित्रपटाला देखील एकही पुरस्कार हा मिळाला नाही. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.
कंगना राणावत हिचा पत्ता कट झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कंगना राणावत हिच्याऐवजी क्रिती सनॉन आणि आलिया भट्ट यांना बेस्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नुकताच क्रिती सनॉन हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये क्रिती सनॉन हिने राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर भाष्य केले आहे.
क्रिती सनॉन ही म्हणाली की, राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला हेच मला काही वेळ माहिती नव्हते. ज्यावेळी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या नावाची घोषणा ही केली जात होती. त्यावेळी मी घरीच एका मिटिंगमध्ये होते. त्यावेळी मला खूप जास्त फोन येत होते. त्यामुळे मी मिटिंग थांबवली आणि फोन घेतला आणि मला त्यावेळी समजले की, मला पुरस्कार मिळाला आहे.
मला जेंव्हा समजले की, मला पुरस्कार मिळाला, त्यानंतर मी माझ्या आई वडिलांची गळाभेट घेतली. त्यानंतर मी लगेचच आलिया भट्ट हिला फोन केला. आलिया भट्ट ही देखील खूप जास्त आनंदात होती. क्रिती सनॉन हिने आपल्या करिअरची सुरूवात 2014 मध्ये केली. क्रिती सनॉन हिने काही हिट चित्रपट दिले आहेत. मिमी या चित्रपटासाठी क्रिती सनॉन हिला हा पुरस्कार मिळाला आहे.