Adipurush | ‘आदिपुरुष’च्या वादावर अखेर क्रिती सनॉनच्या आईने सोडलं मौन; प्रतिक्रिया वाचून भडकले नेटकरी

आदिपुरुष या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कमी होत असलेला पाहून निर्मात्यांनी आता तिकिटावर ऑफर दिली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या चित्रपटाचं तिकिट 150 रुपयांना मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Adipurush | 'आदिपुरुष'च्या वादावर अखेर क्रिती सनॉनच्या आईने सोडलं मौन; प्रतिक्रिया वाचून भडकले नेटकरी
Kriti Sanon with motherImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 8:42 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून अद्याप वाद सुरू आहे. या चित्रपटातील कलाकारांचा लूक, त्यातील सीन्स, डायलॉग्स आणि व्हीएफएक्स यांवरून प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रतिक्रियांमुळे आता बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून येत आहे. सर्वसामान्यांसोबतच बरेच सेलिब्रिटीसुद्धा या चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप नोंदवत आहेत. अशातच अभिनेत्री क्रिती सनॉनची आई गीता सनॉन यांनी ‘आदिपुरुष’च्या वादावर मौन सोडलं आहे. क्रितीने या चित्रपटात जानकीची (सीता) भूमिका साकारली आहे. तर प्रभासने राघव (राम), सैफ अली खानने लंकेश (रावण), सनी सिंहने शेष (लक्ष्मण) आणि देवदत्ता नागेनं बजरंगची (हनुमान) भूमिका साकारली आहे.

“जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत देखी तिन तैसी”, या पंक्तींचा अर्थ सांगत त्या म्हणाल्या, “याचा अर्थ असा आहे की जर तुमची मानसिकता आणि दृष्टीकोन चांगला असेल तर जग तुम्हाला फक्त सुंदरच दिसेल. प्रभू श्रीराम यांनी स्वत: आपल्याला हेच शिकवलं आहे की शबरीच्या फळांमध्ये प्रेम शोधा. ते फळ उष्टे आहेत याकडे लक्ष देऊ नका. अशा प्रकारे आपण चुकांकडे दुर्लक्ष करून भावना समजून घेतल्या पाहिजेत. जय श्री राम!”

हे सुद्धा वाचा

गीता सनॉन यांनी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट लिहिली आहे. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘भावनांचाच तर सगळा खेळ आहे. या चित्रपटाने लोकांच्या भावनांनाच समजून घेतलं नाही. उलट तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करत आहात की आम्ही त्यांच्या भावना समजून घ्याव्यात’, अशा शब्दांत एका युजरने राग व्यक्त केला. तर ‘आपल्या इतिहासाचा इतका मोठा अपमान सहन करून त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे’, असा सवाल दुसऱ्याने केला. आदिपुरुष या चित्रपटात कोणत्याच भावना नाहीत, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

पहा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Geeta Sanon (@geeta_sanon)

आदिपुरुष या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कमी होत असलेला पाहून निर्मात्यांनी आता तिकिटावर ऑफर दिली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी या चित्रपटाचं तिकिट 150 रुपयांना मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. मात्र यातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्स यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ हा चित्रपट असल्याची टीका अनेकांकडून होत आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.