Adipurush | नाशिकच्या सीता गुफा मंदिरात पोहोचली क्रिती सनॉन; ‘राम सिया राम’ म्हणत केली आरती

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Adipurush | नाशिकच्या सीता गुफा मंदिरात पोहोचली क्रिती सनॉन; 'राम सिया राम' म्हणत केली आरती
Kriti SanonImage Credit source: Instagram/Manav Manglani
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 1:28 PM

नाशिक : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये अभिनेता प्रभासने राघव तर अभिनेत्री क्रिती सनॉनने जानकीची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्यातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. त्यानंतर आता निर्मात्यांनी ‘राम सिया राम’ हे या चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित केलं आहे. आदिपुरुषच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली असता क्रितीने सिता गुफा मंदिराला भेट दिली आहे. वनवासात असताना राम आणि सीता या गुफेत राहिल्याचं म्हटलं जातं. यावेळी क्रितीसोबत प्रसिद्ध गायकांची जोडी साचेत आणि परंपरासुद्धा होते. त्यांच्यासोबत मिळून क्रितीने मंदिरात आरती केली.

मनोज मुंतशीर लिखित ‘राम सिया राम’ हे गाणं साचेत आणि परंपरा या जोडीनेच गायलं आहे. राम आणि सीता यांच्यातील बंधावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात ‘जानकी राघव की है और राघव की ही रहेगी’ असा संवाद क्रितीच्या तोंडी आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रामायणावर आधारित आहे. यामध्ये प्रभासने राघव, क्रिती सनॉने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण आणि सैफ अली खानने लंकेशची भूमिका साकारली आहे. येत्या 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र टीझरवर आलेल्या प्रेक्षकांच्या नकारात्मक प्रतिसादानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पाच ते सहा महिन्यांची मुदत वाढवून घेतली.

“त्या पाच – सहा महिन्यांचा कालावधी मिळणे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आव्हानं प्रत्येक गोष्टीत असतात. पण ही आव्हानं आमच्या चित्रपटाला अधिक चांगला आणि मजबूत बनवेल. आम्ही अशा तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे जो मार्व्हल, डीसी, अवतार यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये दाखवला गेला”, असं ओम राऊत म्हणाले.

या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिजने केली आहे. टी-सीरिजचे निर्माते भूषण कपूर चित्रपटाविषयी म्हणाले, “सुरुवातीला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद नेहमीच पुढे जाऊन कामी येतो. आम्ही थोडे निराश झालो होतो. पण आम्ही पुन्हा चित्रपटावर मेहनत घेतली. घडलेल्या गोष्टींमधून आम्ही शिकलो आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी सुचवलेल्या गोष्टींनुसार आम्ही काही बदल केले. आता आम्ही जो चित्रपट बनवला आहे, त्यावर खूप खुश आहोत.”

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.