Adipurush सिनेमामुळे क्रिती सनॉन हिचं मोठं नुकसान; ‘या’ आठ गोष्टींचा अभिनेत्रीला करावा लागला सामना?

| Updated on: Jun 29, 2023 | 2:46 PM

Adipurush सिनेमामुळे 'या' आठ गोष्टींचा अभिनेत्रीला करावा लागला सामना? सिनेमा फ्लॉप ठरल्यामुळे प्रभास याचं नाही तर, क्रिती सनॉन हिचं मोठं नुकसान...

Adipurush सिनेमामुळे क्रिती सनॉन हिचं मोठं नुकसान; या आठ गोष्टींचा अभिनेत्रीला करावा लागला सामना?
Follow us on

मुंबई : ‘आदिपुरुष’ सिनेमाची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित तर झाला, पण आता सिनेमाला सर्वच स्तरातून विरोध आहे. सिनेमातील डायलॉग आणि कलाकारांना सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर विरोधाचा सामना करावा लागला. अनेकांनी तर ‘आदिपुरुष’ म्हणजे कलयुगी रामायण असं देखील म्हटलं आहे. एवढंच नाही तर, सिनेमातील कलाकारांवर देखील अनेक जण निशाणा साधत आहेत.. सिनेमात अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण सिनेमाला झालेल्या विरोधाचा मोठा फटका क्रिती सनॉन हिला बसला आहे…

‘या’ आठ गोष्टींचा अभिनेत्रीला करावा लागला सामना?

१. ६०० कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या सिनेमाने ३०० कोटी रुपयांची देखील कमाई केलेली नाही. रिपोर्टनुसार, सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरल्यामुळे क्रिती सनॉन हिला मोठा फटका बसला आहे.

२. रिपोर्टनुसार, ‘आदिपुरुष’ सिनेमा फेल ठरल्यामुळे क्रिती हिने स्वतःची फी कमी केली आहे. यामुळे पुढे येणाऱ्या सिनेमांमध्ये क्रिती कमी मानधन घेत सिनेमात झळकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

३. ‘आदिपुरुष’ सिनेमासाठी क्रिती सनॉन हिने तीन कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर प्रभास याने तब्बल १०० कोटी रुपयांचं मानधन घेतलं होतं.

४. ‘आदिपुरुष’ सिनेमानंतर अभिनेता प्रभास याच्याकडे आणखी काही मोठे प्रोजेक्ट आहेत. सिनेमा फ्लॉप ठरल्याचा अभिनेत्याच्या फी स्ट्रक्चवर कोणताही परिणाम झालेला नाही.

५ . ‘आदिपुरुष’ सिनेमा फ्लॉप ठरल्यामुळे क्रिती सनॉन हिला स्वतःच्या मानधनात कपात करावी लागली आहे.

६. रिपोर्टनुसार गेल्या चार वर्षांमध्ये क्रितीने कोणताही हीट सिनेमा दिलेला नाही. ज्यामुळे अभिनेत्रीचं करिअर धोक्यात आलं आहे.. अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.

७. ओम राऊत आणि मनोज मुंतशिर यांना फक्त टीकेचा सामना करावा लागला आहे. यापेक्षा दोघांना अधिक नुकसानाचा सामना कराला लागला नाही..

८. प्रभास, ओम राऊत आणि मनोज मुंतशिर यांचं अधिक नुसकान झालं नसून क्रिती सनॉन हिचं मात्र ‘आदिपुरुष’नंतर मोठं नुकसान झालं आहे.

अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सनॉन स्टारर ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या सर्वत्र आदिपुरुष सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी देखील नाराजी देखील व्यक्ती केली.