‘आदिपुरुष’च्या वादानंतर क्रिती सनॉनने घेतला मोठा निर्णय? करिअर होणारा परिणाम पाहून ठरवली ‘ही’ गोष्ट

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. मात्र यातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्स यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे.

'आदिपुरुष'च्या वादानंतर क्रिती सनॉनने घेतला मोठा निर्णय? करिअर होणारा परिणाम पाहून ठरवली 'ही' गोष्ट
Adipurush
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 10:43 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून अद्याप सोशल मीडियावर टिकाटिप्पणी सुरूच आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा बिग बजेट चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित झाला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ओम राऊत यांचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला होता. त्यामुळे त्यांच्या या दुसऱ्या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. रामायण या महाकाव्यावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने राघव (श्रीराम), क्रिती सनॉनने जानकी (सीता), सनी सिंहने शेष (लक्ष्मण), देवदत्त नागेनं बजरंग (हनुमान) आणि सैफ अली खानने लंकेशची (रावण) भूमिका साकारली. प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनानंतर चारही बाजूंनी टीकांचा सामना करावा लागला. चित्रपटावरून झालेल्या वादानंतर आता क्रिती सनॉनने मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे.

क्रितीने चित्रपटातील जानकीच्या भूमिकेसाठी जवळपास तीन कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. या भूमिकेसाठी तिने फार मेहनत घेतली होती. मात्र चित्रपटाच्या अपयशानंतर क्रितीने तिची फी कमी केल्याची माहिती समोर येत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या कामगिरीमुळे तिने हा निर्णय घेतल्याचं कळतंय. त्याचसोबत तिच्या करिअरवरही त्याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं जात आहे. कारण चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत टीमला नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोय.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

चित्रपटावर सतत होत असलेल्या टीकांच्या पार्श्वभूमीवर क्रितीची आई गीता सेनॉन यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. “जाकी रही भावना जैसी, प्रभू मुरत देखी तिन तैसी”, या पंक्तींचा अर्थ सांगत त्यांनी लिहिलं होतं, “याचा अर्थ असा आहे की जर तुमची मानसिकता आणि दृष्टीकोन चांगला असेल तर जग तुम्हाला फक्त सुंदरच दिसेल. प्रभू श्रीराम यांनी स्वत: आपल्याला हेच शिकवलं आहे की शबरीच्या फळांमध्ये प्रेम शोधा. ते फळ उष्टे आहेत याकडे लक्ष देऊ नका. अशा प्रकारे आपण चुकांकडे दुर्लक्ष करून भावना समजून घेतल्या पाहिजेत. जय श्री राम!” गीता यांच्याही पोस्टवर नेटकऱ्यांनी ‘आदिपुरुष’चं समर्थन करू नका, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट रामायण या महाकाव्यावर आधारित आहे. मात्र यातील कलाकारांच्या भूमिका, त्यांचा लूक, व्हीएफएक्स आणि डायलॉग्स यांवरून प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. रामायण कसं दाखवू नये याचं मूर्तिमंत उदाहरण ‘आदिपुरुष’ हा चित्रपट असल्याची टीका अनेकांकडून होत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.