अरमान मलिकच्या दुसऱ्या पत्नीचे हैराण करणारे भाष्य, कृतिका थेट म्हणाली, दुसऱ्याचा पतीच…
बिग बॉस ओटीटी 3 हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये धमाके होताना दिसत आहेत. बिग बॉस ओटीटीमध्ये अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत सहभागी झालाय. अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक हिने अरमानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा केला.
अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी पायल आणि कृतिका सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. अरमान मलिक हा दोन्ही पत्नींसोबत बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झालाय. चर्चेचा विषयच अरमान मलिक आहे. अनेकजण यांच्यावर जोरदार टीका करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक हिने अरमान आणि कृतिका यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केलाय. त्यावेळी नेमके काय घडले आणि यांचे लग्न कसे झाले हे सांगताना पायल मलिक ही दिसली. हेच नाही तर ढसाढसा रडताना देखील पायल दिसली.
आता नुकताच कृतिका हिने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. कृतिका ही बिग बॉसच्या घरात अरमान मलिक याचा टॉवेल वापरताना दिसली. यावर पोलोमी दास कृतिकाला म्हणते की, तू पतीचा टॉवेल वापरायला नाही पाहिजे. तुम्ही लोक एकमेकांचे टॉवेल वापरतात का? विशेष म्हणजे त्यावेळी अरमान मलिक देखील तिथेच उपस्थित होता.
अरमान पोलोमी दास हिला म्हणतो की, आम्ही एकमेकांचे टॉवेल वापरतो. आता पती पत्नी म्हटले की, थोडी वापरणार नाहीत ना..मात्र, यावेळी कृतिका मलिक ही असे काही बोलते की, ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. कृतिका मलिक म्हणते की, अरे दुसऱ्याचा पती मी वापरत आहे तर ही टॉवेल काय गोष्ट आहे ना…पुढे कृतिका म्हणते की, मी स्वत:च आता माझी बेईज्जती करून घेणार.
दुसरे कोणी काही बोलले तर तोंड फोडेल. कृतिका मलिकचे हे बोलणे ऐकून पोलोमी दास ही हैराण होताना दिसत आहे. कृतिकाचे बोलणे ऐकून अरमान मलिक हा तिच्याकडे बघतच राहिला. आता कृतिका मलिक हिच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगत आहे. अनेकजण मैत्रिणीच्याच पतीसोबत लग्न केल्यामुळे कृतिकाला खडेबोल सुनावताना दिसतात.
कृतिका मलिक ही अरमान मलिकची दुसरी पत्नी आहे. पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच अरमान आणि कृतिका यांनी लग्न केले. कृतिका मलिक हिला एक मुलगा आहे तर पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. विशेष म्हणजे अरमान मलिक, कृतिका आणि पायल हे एकाच घरात राहतात. अरमान मलिक हा तब्बल 200 कोटी संपत्तीचा मालक आहे, त्यानेच याबद्दलचा खुलासा केला होता.