देव जरी धावून आला तरी..; कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाच्या पत्नीचं रोखठोक वक्तव्य

गेल्या काही वर्षांपासून कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यात वाद सुरू आहे. गोविंदाने अनेकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली होती. मात्र त्या एपिसोडमध्ये अभिनय करण्यास कृष्णाने नकार दिला होता. मामासमोर जाणं त्याने टाळलं होतं.

देव जरी धावून आला तरी..; कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाच्या पत्नीचं रोखठोक वक्तव्य
कश्मीरा-कृष्णा अभिषेक आणि गोविंदा-सुनिता अहुजाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 12:52 PM

अभिनेता गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वाद जगजाहीर आहे. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांनी अनेकदा माध्यमांसमोर याविषयी आपलं मत मांडलं. कृष्णा आणि त्याची पत्नी कश्मीरा शाहनेही त्यांची बाजू मांडली. मात्र तरीसुद्धा या दोन्ही कुटुंबातील नाती पहिल्यासारखी राहिली नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनिताने पुन्हा एकदा या वादावर मोकळेपणे वक्तव्य केलंय. इतकंच काय तर जोपर्यंत कृष्णा ‘द कपिल शर्मा शो’चा भाग असेल तोपर्यंत त्या शोमध्ये पाऊल ठेवणार नाही, असं तिने म्हटलंय. त्यावर आता कृष्णाचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

कृष्णाची प्रतिक्रिया

‘एचटी सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, “माझं मामीवर खूप प्रेम आहे. मामीने तिच्या मुलासारखं माझ्यावर प्रेम केलंय आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. त्यामुळे तिला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे. मला माहितीये की ते हे सर्व रागाच्या भरात बोलतेय. ती माझी मामी आहे, मी तिचं मन जिंकून घेऊन. त्यांच्या मनात काही खोट नाही.”

काय म्हणाली गोविंदाची पत्नी?

‘टाइम आऊट विथ अंकित’ या शोमध्ये सुनिताने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न जाण्यामागचं खरं कारण सांगितलं होतं. “मी खोटं बोलणार नाही. कृष्णा-कश्मीरासोबत माझं जमत नाही. जर ती लोकं नसती, तर मी कपिल शर्माच्या शोमध्ये नक्कीच गेले असते. पण कृष्णा कपिलसोबत काम करतो. अन्यथा मला त्या शोमध्ये जायला आवडलं असतं. माझ्या आयुष्यातील एक नियम आहे की जर मी एखाद्या व्यक्तीला सोडलं तर देवानेही येऊन माझी समजूत घातली तरी मी त्या व्यक्तीला माफ करणार नाही. जर चूक माझी नसेल आणि लोकांनी गैरवर्तन केलं असेल तर मग त्या व्यक्तीचा मी चेहराही बघत नाही”, असं सुनिता म्हणाली होती.

हे सुद्धा वाचा

कृष्णा आणि गोविंदा यांच्यातील वाद हा कश्मीरा शाहच्या एका ट्विटमुळे सुरू झाला होता. 2016 मध्ये कृष्णा एक शो करत होता, ज्यामध्ये गोविंदाला आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याने भाच्याच्या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर कृष्णाची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीराने एक ट्विट केलं होतं. ‘काही लोक पैशांसाठी डान्स करतात’, असं तिने ट्विटद्वारे टोमणा मारला होता. गोविंदाची पत्नी सुनिताला असं वाटलं की कश्मीराने हे ट्विट त्यांच्या कुटुंबीयांसाठी केलंय. यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये तणाव निर्माण झाला. कश्मीरा आणि सुनीता यांच्यात त्यानंतर बरीच बाचाबाची झाली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.