‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर लिहिली भावूक पोस्ट

'बाबा.. तुमची खूप आठवण येईल', 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीला पितृशोक

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन; सोशल मीडियावर लिहिली भावूक पोस्ट
Pooja BanerjiiImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 11:39 AM

मुंबई: ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री पूजा बॅनर्जीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पूजाच्या वडिलांचं निधन झालं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने खुद्द याविषयीची माहिती दिली. वडिलांचा फोटो पोस्ट करत पूजाने भावना व्यक्त केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शोक व्यक्त होत आहे.

‘बाबा.. तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे. मला माहितीये की तुम्ही चांगल्या ठिकाणी असाल. तुमची खूप आठवण येईल’, अशा भावूक पोस्ट पूजाने लिहिली आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

कुमकुम भाग्य या मालिकेत खलनायकी भूमिका साकारल्यामुळे पूजाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. गरोदरपणामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला. तेव्हा मालिकेत तिची जागा अभिनेत्री टिना फिलिपने घेतली. जुलै महिन्यात पूजाने मुलीला जन्म दिला.

पूजाने ‘कसौटी जिंदगी की 2’ या मालिकेतही भूमिका साकारली होती. यातही तिच्या नकारात्मक भूमिकेचं विशेष कौतुक झालं. प्रेग्नन्सीमुळे ती गेल्या काही काळापासून टीव्ही इंडस्ट्रीपासून दूर आहे.

पूजाने एमटीव्ही रोडीज या रिॲलिटी शोमधून टेलिव्हिजन करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिला ‘इक दुसरे से करते है प्यार हम’ या मालिकेत पहिल्यांदा मुख्य भूमिका मिळाली. एकता कपूरच्या चंद्रकांता, चंद्रनंदिनी आणि दिल ही तो है यांसारख्या मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली. 2019 मध्ये तिने ‘नच बलिये’ या डान्स रिॲलिटी शोच्या नवव्या सिझनमध्येही भाग घेतला होता.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.