Casting Couch : कास्टिंग एजंटने ‘तिला’ हॉटेलमध्ये बोलावलं, २२ वर्षीय अभिनेत्रीवर ओढावला धक्कादायक प्रसंग

Casting Couch : २२ वर्षीय अभिनेत्रीला कास्टिंग एजंटने हॉटेलमध्ये बोलावलं, त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं... खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा... अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो...

Casting Couch : कास्टिंग एजंटने 'तिला' हॉटेलमध्ये बोलावलं, २२ वर्षीय अभिनेत्रीवर ओढावला धक्कादायक प्रसंग
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 10:17 AM

मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात अनेक अभिनेत्री अशा आहेत, ज्यांचं कुटुंब इंडस्ट्रीमधील नाही. म्हणून अभिनेत्रींना इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो… असं अनेक नव्या अभिनेत्रींनी सांगितलं. एवढंच नाही तर, अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेले चांगले वाईट अनुभव मुलाखतीच्या चाहत्यांना सांगितले आहेत. शिवाय कास्टिग काऊचमुळे अनेक अभिनेत्रींनी अभिनयाचा निरोप घेतला. आता देखील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेली एक धक्कादायक घेटना सांगितली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे.

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री मृणाल नवल हिने तिला आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्रीने सांगितलेली घटना अत्यंत हैराण करणारी आहे. एका जाहिरातीसाठी कास्टिंग एजंटने अभिनेत्रीला तडजोड करण्यास सांगितलं होतं. कास्टिंग एजंटने शारीरिक संबंधांची मागणी केल्यानंतर अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं.

मृणाल नवल म्हणाली, ‘ही घटना वर्षभरापूर्वीची आहे. जेव्ही मी माझ्या मालिकेसाठी शूट करत होती. तेव्हा जाहिरातींसाठी ऑडिशन देखील देत होती. तेव्हा एक कास्टिंग एजंट मला म्हणाला, दोन मुलींचं नाव शॉर्ट लिस्ट झालं आहे. त्यामधील एका अभिनेत्रीला अभिनेता कार्तिक आर्यन याच्यासोबत स्क्रिन शेअर करता येणार आहे…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘फोनवर बोलणं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मेसेज आला होता. भूमिका मिळवण्यासाठी तडजोड करावी लागेल. त्याने मला हॉटेलमध्ये बोलावलं.  मला त्याचा हेतू कळला होता. पण तरी देखील मी त्याला विचारलं नक्की काय करावं लागेल. त्याने मला उत्तर दिलं, तो म्हणाला, ‘काही हुकअप, एक नाईट आऊट आणि तेव्हा आपण करार ठरवू..’

कास्टिंग एजंटची मागणी जाणून अभिनेत्रीला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीने कास्टिंग एजंटला नकार दिला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी त्याला नकार दिला. पण त्याने माझ्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तुझ्यासाठी ही उत्तम संधी आहे. सिनेमांसाठी देखील तुला भूमिका मिळवून देईल. तेव्हा मला त्या व्यक्तीचा प्रचंड राग आला.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

अखेर ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री मृणाल नवल हिने कास्टिंग एजंटला ब्लॉक केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मुलींना या सर्व गोष्टीमुळे सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतीही परिस्थिती समोर आली तरी मनात भीती बळगायची नाही.. तडजोड न करता देखील काम मिळतं.’ सध्या सर्वत्र ‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री मृणाल नवल हिची चर्चा रंगली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.