‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं निधन, बायको आणि दोन चिमुकल्या मुलांना सोडून 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... निधनाचं कारण धक्कादायक

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 3:12 PM

टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकास सेठी आहे. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने बायको आणि जुळ्या मुलांना सोडून वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहत आहे.

विकास सेठी याच्या निधनामुळे टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. 2002 पासून विकास घरा-घरात प्रसिद्ध होता. अभिनेत्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. आता अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबिय, चाहते आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

रिपोर्टनुसार, 8 सप्टेंबर, रविवारी विकास याचं निधन झालं. झोपेच अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण अद्यापही विकास सेठी याच्या कुटुंबियांकडून कोणतं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.

विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा. अभिनेत्याने शेवटची पोस्ट 12 मे रोजी केली होती. ज्यामध्ये अभिनेता त्याच्या आईसोबत दिसला.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

विकास सेठी याचं निधन झालं आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याच्या निधनावर चाहते कमेंट करत दुःख व्यक्त करत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ही फेक बातमी तर नाही ना?’, दुसरा नेटकरी म्हणाला ‘फार लवकर निधन झालं. दोन मुलं आहेत त्याला…’ तर अनेक जण अभिनेत्याला नक्की काय झालं होतं? असा प्रश्न विचारत आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.