शेवटच्या क्षणी ‘या’ अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात केलं घर, चाहत्यांची संख्या मोठी असताना देखील शेवटच्या क्षणी अभिनेत्री जवळ पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं, झाली होती प्रचंड वाईट अवस्था

शेवटच्या क्षणी 'या' अभिनेत्रीची अत्यंत वाईट अवस्था; पाणी पाजण्यासाठी देखील नव्हतं कोणी जवळ
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 12:01 PM

Lalita Pawar Death Anniversary : आयुष्यात कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही. बॉलिवूड कलाकारांसोबत देखील अनेक अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांच्या स्वप्नांना ब्रेक लागला. पण तरी देखील कलाकारांनी हार मानली नाही. स्वप्न पूर्ण झाले नसले तरी त्यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं आहे. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar). आज ललिता पवार आपल्यात नसल्या तरी त्यांच्या आठवणी कायम चाहत्यांना प्रेरणा देतात. ललिता पवार यांना बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. पण त्यांचं हे स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. (Lalita Pawar Death Anniversary)

१९४२ साली जेव्हा ‘जंग-ए-आजादी’ सिनेमाची शुटिंग सुरु होती. सिनेमातील एका सीनमध्ये अभिनेते भगवान दादा यांना ललिता पवार यांच्या जोरात कानशिलात मारायची होती. तेव्हा भगवान यांनी जोरात ललिता यांच्या कानशिलात लगावली आणि अभिनेत्रीच्या कानाच्या पडद्यांना मोठा त्रास झाला. यामुळे ललिता पवार यांच्या डोळ्यांना देखील दुखापत झाली.

एवढंच नाही तर, उपचार चुकीचे झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली. ललिता यांच्या शरीराचा एक भाग निकामी झाला. एवढी मोठी घटना घडल्यानंतर कोणीही खचून जाईल. पण ललिता पवार यांनी हार मानली नाही. या अवस्थेवर मात करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी लागला आणि त्यांनी पुन्हा झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. (lalita pawar marathi movie list)

ललिता पवार यांचं अभिनेत्री होण्याचं स्वप्न तर पूर्ण झालं नाही, पण रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या मंथरा भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांची मंथरा भूमिका आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. ललिता पवार यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले.

ललिता पवार यांचं लग्न गणपतराव पवार यांच्यासोबत झालं होतं. पण गणपतराव यांनी पत्नीची फसवणूक केली. कालांतराने गणपतराव यांचं जीव ललिता यांच्या लहान बहिणीवर जडला. त्यानंतर ललिता यांनी राजप्रकाश गुप्ता यांच्यासोबत लग्न केलं. दोन लग्न होवून देखील ललिता यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं. (lalita pawar husband)

ललिता जेव्हा शेवटचा श्वास घेत होत्या, तेव्हा त्या बंगल्यात एकट्या होत्या आणि त्यांचे पती रुग्णालयात दाखल होते. तेव्हा ललिता यांना शेवटच्या क्षणी पाणी पाजण्यासाठी देखील कोणीही नव्हतं. अखेर २४ फेब्रुवारी १९८८ साली ललिता पवार यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती तीन दिवसांनंतर मिळाली, जेव्हा पोलिसांनी त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडला तेव्हा त्या मृत अवस्थेत आढळल्या.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.