लारा दत्ता हिच्या मुलीच्या सौंदर्यापुढे अव्वल अभिनेत्री फेल; फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि जुही चावला यांच्या मुली त्यांच्या आईपेक्षाही प्रचंड सुंदर दिसतात. आता अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिच्या लेकीची चर्चा रंगत आहे.

लारा दत्ता हिच्या मुलीच्या सौंदर्यापुढे अव्वल अभिनेत्री फेल; फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
लारा दत्ता हिच्या मुलीच्या सौंदर्यापुढे अव्वल अभिनेत्री फेल; फोटो व्हायरल होताच चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 9:02 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत आहेत स्टारकिड्स. सध्या सर्वत्र स्टारकिड्सची चर्चा होत असते. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि जुही चावला यांच्या मुली त्यांच्या आईपेक्षाही प्रचंड सुंदर दिसतात. आता अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स लारा दत्ता हिच्या लेकीची चर्चा रंगत आहे. लारा हिच्या लेकीचं नाव सायरा भुपती असं आहे. नुकताच लाराने लेकीचा ११ वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. शिवाय इन्स्टाग्रामवर लेकीचे फोटो पोस्ट करत लाराने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आहेत.

सायरा हिचे फोटो पोस्ट करत लारा कॅप्शनमध्ये म्हणते, ‘माझी सुंदर मुलगी, कायम आनंदी, विनम्र राहा, आई तुझ्यावर प्रचंड प्रेम करते.. (बाबांना सांगू नको)’ लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लाराने पती महेश भुपती यांना देखील टॅग केलं आहे. सध्या लाराची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लाराने लेकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही तासांत फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव चाहत्यांनी केला. सायराच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री हुमा कुरैशी हिने लाराच्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कमेंट करत म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे सायरो..’, तर टिस्का चोप्रा कमेंट करत म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे स्वीटी, तारा ने प्यार भेजा है।’ सध्या सायराचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्यायरल होत आहेत.

लारा आणि महेश यांचं लग्न

लारा दत्ता यांनी महेश भूपती यांनी १६ फेब्रुवारी 2011 मुंबई येथील वांद्रे याठिकाणी लग्न केलं. महेश माजी टेनिस प्लेयर आहेत, तर साराने अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे. लग्नानंतर लारा हिने 2012 मध्ये सायरा हिला जन्म दिला. लारा सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर लाराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. लारा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. लाराच्या इन्स्टाग्राम स्वतःचे वेग-वेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ आहेत.

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.