‘कैकेयी’च्या भूमिकेबद्दल लारा दत्ताकडून मोठा खुलासा; ‘रामायण’विषयी म्हणाली..

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा बॉलिवूडमधील बिग बजेट चित्रपट असणार आहे. यामध्ये अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत. अभिनेत्री लारा दत्ताने पहिल्यांदाच या चित्रपटाविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

'कैकेयी'च्या भूमिकेबद्दल लारा दत्ताकडून मोठा खुलासा; 'रामायण'विषयी म्हणाली..
Lara DuttaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 01, 2024 | 4:59 PM

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ‘रामायण’च्या सेटवरील काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर लीक झाले आहेत. सुरुवातीच्या काही फोटोंमध्ये अभिनेते अरुण गोविल हे दशरथ यांच्या भूमिकेत आणि अभिनेत्री लारा दत्ता कैकेयीच्या भूमिकेत पहायला मिळाली. आता पहिल्यांदाच लाराने या चर्चांवर मौन सोडलं आहे. त्याचप्रमाणे तिने चित्रपटाविषयी मोठी हिंटसुद्धा दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लारा म्हणाली, “मीसुद्धा त्याबद्दल खूप ऐकतेय. पण मी त्या चर्चा तशाच होऊ देणार आहे. कारण त्याविषयी वाचायला आणि ऐकायला मलासुद्धा आवडतंय. त्यामुळे तुम्ही त्याबद्दल चर्चा करत राहा. रामायणसारख्या चित्रपटात कोणाला काम करायला आवडणार नाही? जर मला ऑफर दिली तर रामायणातील अशा अनेक भूमिका आहेत, ज्या साकारण्याची माझी इच्छा आहे. शुर्पणखा, मंडोदरी.. मी त्या सर्व भूमिका साकारतेय (हसते).” रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेत प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल हे या चित्रपटात दशरथाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय चित्रपटातील इतरही भूमिकांसाठी काही कलाकारांच्या नावांची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.

यामध्ये रावणाची भूमिका कोण साकारणार हे अद्याप स्पष्ट झालं नाही. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.

एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.