राजकुमारावर जडलं होतं Lata Mageshkar यांचं प्रेम; असा झाला नात्याचा शेवट

प्रत्येकाची 'प्रेम कहाणी' पूर्ण होते असं नाही... लता मंगेशकर यांना देखील खासगी आयुष्यात करावा लागला मोठा त्याग... ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याचं व्यक्तीसोबत...

राजकुमारावर जडलं होतं Lata Mageshkar यांचं प्रेम; असा झाला नात्याचा शेवट
lata mangeshkar
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 12:23 PM

Lata Mageshkar : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) म्हणजेच आपल्या लतादीदी यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं. पण तरी देखील दीदी आपल्यामध्ये आजही आहेत… अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. लतादीदी यांनी कायम संगीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या गाण्यातून, आवाजातून इतरांना प्रेम करायला शिकवलं. आज अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहे. दीदीच्या आठवणीत आज प्रत्येक भारतीय जगत आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. संगीत क्षेत्रात दीदी अव्वल स्थानी होत्या आणि आहेत, तरी त्यांनी लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला.

ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, की दीदी यांच्या आयुष्यात देखील एक खास व्यक्ती होती. पण त्यांची लव्हस्टोरी कधीही पूर्ण होवू शकली नाही. रिपोर्टनुसार दीदी डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh) यांच्यावर प्रेम करत होत्या. जेव्हा महाराजा राज सिंह यांचे वडील महारावल लक्ष्मण सिंह यांनी लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्यांनी लग्नाला नकार दिला.

पण दीदी शाही कुटुंबातील नसल्यामुळे महाराजा राज सिंह यांच्यासोबत लग्न होवू शकलं नाही. अशात दोघांचं नातं कायमसाठी संपलं आणि प्रेम अपूर्ण राहिलं. पण दीदी आणि महाराजा राज सिंह यांचं नातं इतकं पक्क होतं की, लता मंगेशकर यांनी कधीही लग्न केलं नाही. दोघांचं लग्न झालं नाही, पण दोघे कायमसाठी चांगले मित्र राहिले.

शिवाय लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करताना दीदींनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न देखील केलं नाही. लता दीदी यांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. दीदीच्या आठवणी कायम प्रत्येकाच्या मनात राहतील. (lata didi)

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ सली मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला होता. लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात मोठ्या कन्या होत्या. लतादीदी यांच्यानंतर मीना, आशा आणि उषा यांचा जन्म झाला. त्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म झाला. (lata didi family)

भारतीय संगीतविश्वात लतादीदी यांचं योगदान अत्यंत मोलाचं. संगीत कलाकार म्हणून त्यांनी अनेक गाणी गायली. लतादीदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. दीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी सिनेमांमध्ये गाणी गायली.

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.