लता मंगेशकर राहत असलेली इमारत सील, प्रभुकुंज सोसायटी परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेनी सील केली आहे (Lata Mangeshkar’s building sealed).

लता मंगेशकर राहत असलेली इमारत सील, प्रभुकुंज सोसायटी परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी
Follow us
| Updated on: Aug 29, 2020 | 11:45 PM

मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर राहत असलेली प्रभुकुंज सोसायटी मुंबई महापालिकेनी सील केली आहे. प्रभुकुंज सोसायटीत गेल्या आठवड्यात पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे (Lata Mangeshkar’s building sealed).

प्रभुकुंज सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर वास्तव्यास आहेत. याशिवाय सोसायटीत काही वयस्कर रहिवासीदेखील वास्तव्यास आहेत. त्यामुळे सोसायटीतील सर्व रहिवाश्यांच्या एकमताने सोसायटी सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे (Lata Mangeshkar’s building sealed).

लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांनी याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. “आम्हाला आज संध्याकाळपासून प्रभुकुंज सोसायटी सील करण्याबाबत फोन येत आहेत. प्रभुकुंज सोसायटीतील रहिवासी आणि महापालिका प्रशासनाने मिळून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. वयस्कर रहिवाशांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड सतर्क राहणं जरुरीचं आहे”, असं मंगेशकर कुटुंबियांकडून सांगण्यात आलं आहे.

दिवसभरात 16 हजार 867 रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. विशेष म्हणजे शनिवारी (29 ऑगस्ट) राज्यात सर्वाधिक 16 हजार 867 नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या धडकी भरवणारी आहे. लोकप्रतिनिधी, आरोग्य कर्मचाऱ्यांनादेखील कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे खबरदारी घेणं जरुरीचं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.