मुंबई – अनेक दिवसांपासून कोरोनावरती (covid -19) उपचार घेणा-या भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवल्याची अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 92 वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती मुंबईतील ब्रीच कँडी (breach candy hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर उपचारादरम्यान तब्येतीत चढउतार होत राहिले. काल अचानक त्यांना श्र्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यानंतर त्यांना व्हेटिलेंटरवरती ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातून त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत होते. पण आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.
युग संपले… pic.twitter.com/prMUOK74oW
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
लता दिदींनी अखेरचा श्वास घेतल्यानंतर अनेक मान्यवरांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून आणि इतर सोशल मीडियीच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे. सुरूवातीला संजय राऊत यांनी एक युग संपले असल्याचं ट्विट केल आहे. त्यानंतर एक सुर्य, एक चंद्र, एकच लता असं दुसरं ट्विट केलं आहे, तसेच तिस-या ट्विटमध्ये तेरे बिना भी क्या जिना असं ट्विट केलं आहे.
तेरे बिना भी क्या जिना… pic.twitter.com/rfa8mArQyl
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022
अनेक दशकं गाण्यातून लोकांची सेवा केल्यानंतर त्यांचे देशभरात चाहते निर्माण झाले होते. त्यांनी आत्तापर्यंत 30 भाषांमध्ये गाणी गायली आहे. तसेच 30 हजारांच्यावरती आत्तापर्यंत गाणी गायली आहेत. अत्यंत लहान वयात असताना त्यांनी संगिताची आवड निर्माण व्हावी म्हणून वडिलांना त्यांना संगीत समजून घेण्यास सांगितलं. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कार सुध्दा मिळालेले आहेत.
एक सूर्य
एक चंद्र…
एकच लता… pic.twitter.com/kRPOpeaZQP— Sanjay Raut (@rautsanjay61) February 6, 2022