गुन्हेगारी विश्वातील नवे King! ‘हे’ 2 गुंड सलमान खान याचे ‘जानी दुश्मन’

Salman Khan: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या जीवाला धोका! कोण आहेत सलमान खानचे शत्रू, गुन्हेगारी विश्वातील नवे King! बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूड आणि राजकीय विश्वात सर्वत्र खळबळ

गुन्हेगारी विश्वातील नवे King! 'हे' 2 गुंड सलमान खान याचे 'जानी दुश्मन'
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 12:21 PM

Baba Siddique Case: देश सध्या नव्या उभरत्या गुंडांना पाहात आहे. ज्यांचं नाव लॉरेन्स बिश्नोई असून तो तुरुंगात राहून धमकी आणि हत्या यांसाऱ्या गंभीर गुन्हे प्रत्येक्षात आणताना दिसत आहे. सध्या देशात जे काही सुरु आहे, त्यामागे एकट्या लॉरेन्स बिश्नोई याचा हात नसून इतर लोकं देखील त्याच्यासोबत गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहेत. लॉरेन्सचा मित्र, गुर्गे आणि त्याचा धाकटा भाऊ, या सर्वांनी मिळून लॉरेन्सच्या गुन्हेगारी विश्वाचा विस्तार केला आहे. लॉरेन्स आणि त्याचा लहान भाऊ अनमोल यांनी थेट बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आपला शत्रू मानलं आहे.

लॉरेन्स आणि अनमोल आता अशा लोकांनाही टार्गेट करत आहेत जे सलमान खानच्या जवळ आहेत किंवा त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत आहेत. सांगायचं झालं तर, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे देखील मैत्रीपूर्ण संबंध होते. याच कारणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शनिवारी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली. याआधी सलमान खानसोबत सिनेमात दिसलेल्या एपी ढिल्लोच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. एवढंच नाही तर, काही महिन्यांपूर्वी सलमान खान याच्या घरावर देखील गोळीबार करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

गोळीबार केल्यानंतर घटनेची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली होती. ‘ये सिर्फ ट्रेलर है’ असं म्हणत लॉरेन्स बिश्नोईचा लहान भाऊ अनमोल याने सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी देखील अनमोल याच्यावर आहे. सिद्धूच्या हत्येनंतर अनमोल अझरबैजानला पळून गेला होता. तो अखेरचा अमेरिकेत एका लग्नादरम्यान दिसला होता.

11 राज्यात बिश्नोई गँगचं साम्राज्य

देशात सध्या हाय प्रोफाईल मर्डर केसमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचं नाव सतत समोर येत आहे. याच वर्षी गोगामेडी हत्याकांडमध्ये देखील लॉरेन्सचं नाव समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स याच्या गँगमध्ये 1000 पेक्षा अधिक शुटर्स आहेत. त्याचं साम्राज्य देशातील 11 राज्यांमध्ये आहे. एवढंच नाही तर, 6 देशांमध्ये बॉश्नोई गँगची दहशत आहे.

दाऊद इब्राहिमला आव्हान

लॉरेन्स बिश्नोई याने सर्वांसमोर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला आव्हान दिलं आहे. लॉरेन्सला आता मायानगरीवर राज्य करायचे आहे. लॉरेन्सला बॉलिवूडमध्ये स्वतःची दहशत निर्माण करायची आहे आणि त्याचे साम्राज्य आणखी वाढवायचं असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....