salman khan च्या जीवाला आणखी एका गँगस्टरकडून मोठा धोका; लॉरेंस बिश्नोई याच्यासोबत खास कनेक्शन
salman khan | लॉरेंस बिश्नोई याने सलमान खान याला जीवेमारण्याची जबाबदारी दिली 'या' गँगस्टरला... भाईजानच्या जीवाला मोठा धोका... सध्या सर्वत्र सलमान खान याची चर्चा...
मुंबई | 19 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (salman khan) सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला ई-मेलच्या माध्यामातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आता याप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. लॉरेंस बिश्नोई, गोल्डी ब्रार यांनी सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी दिली होती. आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. लॉरेंस बिश्नोई याने आता सलमान खान याला मारण्याची धमकी गँगस्टर अनमोल बिश्नोई याला दिली आहे… अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. गँगस्टर अनमोल बिश्नोई परदेशात असून लॉरेंस बिश्नोई याचा भाऊ आहे. ज्यामुळे सलमान याच्या प्राण धोक्यात आहेत.. अशी चर्चा देखील जोर धरत आहेत.
सलमान खान जीवेमारण्याचा कट रचणाऱ्यांमध्ये एक नाव समोर येत आहे. परदेशात बसलेला अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा मोठा भाऊ असून त्याने या कामाची जबाबदारी अक्षय बिश्नोई याच्याकडे दिली आहे. अक्षय बिश्नोई हा पंजाबमधील अभोर येथे लॉरेन्सचा शेजारी होता. अक्षय बिश्नोई मूळचा राजस्थान येथील रहिवासी आहे.
अक्षय बिश्नोई याच्याबद्दल सांगायचं झालं तर, गुंड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दिल्ली पोलीस अक्षय बिश्नोई याला लवकरच सन लाईट कॉलनी गोळीबार प्रकरणात चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार आहेत. अक्षय टोळीत अल्पवयीन मुलांची भरती आणि रसद पुरवण्याचे काम पाहतो.
याप्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान सलमान खान याला ई-मेलच्या माध्यमातून जीवेमारण्याची धमकी दिली होती. अभिनेत्याला आलेल्या ई-मेलनंतर त्याची सुरक्षा वाढवण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे फक्त, सलमानच नाही तर त्याच्या कुटुंबालाही इजा करण्याची धमकी देण्यात आली होती.
सलमान खान याच्या कुटुंबाला धमकी दिल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, काही वर्षांपूर्वी काळवीट शिकार केल्या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला दोषी मानलं होतं. सलमान खानने शिकार केलेल्या काळवीटाची बिष्णोई समाज पूजा करतो.
लॉरेन्स बिश्नोई याने हाच राग मनात धरत सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यासाठी लॉरेन्सने अनेकवेळा सलमान खानची रेकीही केली आहे. सध्या सर्वत्र याप्रकरणी खळबळ माजली आहे.