सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई…

बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सलमान खान हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.

सलमान खानला व्हिडीओच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई...
Salman Khan
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 2:03 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. व्हिडीओ तयार करून आरोपीकडून सलमान खानला धमकी देण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ही धमकी सलमान खान याला देण्यात आलीये. गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. हेच नाही तर 14 एप्रिलला सलमान खान याच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. जेंव्हा हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. काही तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात देखील घेतले होते.

आता युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करून सलमानला मारण्याची धमकी देण्यात आलीये. या व्हिडीओनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे देखील कळतंय. बिश्नोई गॅंगच्या नावाने या व्हिडीओमध्ये धमकी देण्यात आली होती. राजस्थान येथून या आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस त्याला मुंबईत घेऊन येत आहेत.

बनवारीलाल गुजर वय 25 असे या आरोपीचे नाव आहे. युट्युबवरील धमकीचा व्हिडिओसमोर येताच गुन्हे शाखा ॲक्शन मोडवर आली. सलमान खान कुठे जातो याची व्हिडीओमध्ये बतावणी करत सलमानला मारण्याची धमकी देण्यात आली होती. व्हिडीओमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या नावाचा उल्लेख देखीस करण्यात आला.

आरोपीला अटक करून काही वेळातच गुन्हे शाखेचे पथक मुंबईत दाखल होणार आहे. पोलिस या प्रकरणातील अजून चाैकशी करत आहेत. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. सलमान खानच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आलीये.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहचले होते. हेच नाही तर सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींनी यापूर्वीच त्याच्या पनवेलच्या घराची अनेकदा रेकी केल्याचीही माहिती पुढे आली.

लॉरेन्स बिश्नोई याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मी अजून गँगस्टरच झालो नाहीये. माझ्या आयुष्यात एकच ध्येय आहे की, ते म्हणजे सलमान खान याला जीवे मारण्याचे. ज्यादिवशी हे पूर्ण होईल, त्यादिवशी मी खऱ्या अर्थाने गँगस्टर होईल. सलमान खान याची सुरक्षा सध्या मुंबई पोलिसांकडून केली जातंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.