सलमान खानवर लक्ष ठेवण्यासाठी बिश्नोई गँगचे 70 हेर, पाकिस्तानमधून मागवले शस्त्र, हल्ल्यानंतर श्रीलंकेत पळून जाण्याचे नियोजन, लॉरेन्स बिश्नोईने..
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खान मोठ्या संपत्तीचा मालक देखील आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सतत सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. हेच नाही तर सलमान खान याच्या घरावर काही दिवसांपूर्वीच गोळीबार करण्यात आलाय.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. सलमान खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सलमान खान याच्या मुंबईतील घरावर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. अवघ्या काही तासांमध्ये सलमान खान याच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. पनवेल पोलिसांकडून चार जणांना नुकताच अटक करण्यात आलीये. मात्र, मुंबईमध्ये सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारा यांचा काही संबंध नाहीये. हे चार आरोपी सलमान खान याच्या पनवेल फार्म हाऊसची रेकी करत होते.
फक्त पनवेल फार्म हाऊसची रेकीच नाही तर सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याच्या तयारीत देखील होते. आता या प्रकरणात अजून हैराण करणारी माहिती पुढे येताना दिसतंय. हेच नाही तर हे चारही जण थेट लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात होते. सलमान खान याच्यावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमधून यांनी शस्त्रे मागवल्याची हैराण करणारी माहिती पुढे येतंय.
जवळपास 60 ते 70 तरूण सलमान खान याच्यावर लक्ष ठेऊन होते. सलमान खानवर हल्ला झाला की, कन्याकुमारीच्या मार्गे श्रीलंकेत पळून जाण्यासही या मुलांना सांगण्यात आल्याची हैराण करणारी माहिती पुढे आली. हेच नाही तर पाकिस्तानमधून AK-47 मागवली. सलमान खानवर हल्ला करण्यासाठी विविध प्लॅनिंग तयार केल्या जात आहेत.
हे सर्वजण लॉरेन्स बिश्नोई यांच्या संपर्कात असल्याचेही सांगितले जातंय. पोलिसांच्या माहितीनुसार सलमान खान याच्यावर हल्ला करण्यासाठी 20 ते 25 जण प्लॅनिंग करत होते आणि यांचा थेट पाकिस्तानमध्ये संपर्क होता. ज्या चार आरोपींना पनवेल पोलिसांनी अटक केलीये, ते चारही जण पनवेलच्या वेगवेगळ्या भागात राहत होते.
या प्रकरणात पोलिस अजूनही काही लोकांच्या शोधात आहेत. सतत सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई याच्याकडून जीवे मारण्चाच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. सध्या या धमक्यांनंतर पोलिसांनी सलमान खान याच्या देखील सुरक्षेत मोठी वाढ केलीये. सलमान खान हा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसतोय. सलमान खानला मिळणाऱ्या धमक्यांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय.