लॉरेन्स बिश्नोईची आता थेट खासदाराला जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, सलमान प्रकरणापासून दूर राहा, नाही तर…

Salman Khan: सलमान खानच्या प्रकरणापासून दूर राहा, रेकी करतोय, नाहीतर मारून टाकेन; लॉरेन्स बिश्नोईची आता थेट खासदाराला धमकी... ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार आणि हत्या प्रकरणानंतर सर्वत्र खळबळ

लॉरेन्स बिश्नोईची आता थेट खासदाराला जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, सलमान प्रकरणापासून दूर राहा, नाही तर...
सलमान खानला धमकी
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 1:58 PM

Salman Khan: सलमान प्रकरणापासून दूर राहा, नाही तर तुझी पण हत्या करेल… अशी धमकी आता गुंड लॉरेन्स बिश्नोई याने थेट एका खासदाराला दिली आहे. लॉरेन्सने ज्या खासदाराला धमकी दिली आहे त्यांचं नाव खासदार पप्पू यादव असं आहे. बिहारच्या पूर्णिया येथील खासदार पप्पू यादव यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धमकी लॉरेन्स बिश्नईने दिली असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कॉल करून धमकी देणारी व्यक्ती पप्पू यादव यांच्या ठिकाणींची रेकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

एवढंच नाही तर, पप्पू यादव यांना सलमान खान याच्या प्रकरणापासून दूर राहा.. असं चेतावनी देखील देण्यात आली आहे. पप्पू यादव यांनी बिहारच्या डीजीपीला या प्रकरणाची माहिती दिली जेणेकरून त्यावर कारवाई करता येईल. धमकी देणाऱ्या व्यक्तीने आणखी एक धक्कादायक दावा केला आहे.

लॉरेन्स बिश्नोई तासाला एक लाख रुपये देऊन जेलमध्ये जॅमर बंद करून पप्पू यादवशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र पप्पू यादव फोन उचलत नाहीत…. असा धक्कादायक दावा धमकी देणाऱ्या व्यक्तीने केला आहे. यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पप्पू यादव यांनी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला खुलं आव्हान दिलं. ‘कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांत लॉरेन्स बिश्नोई सारख्या गुन्हेगारांचं संपूर्ण नेटवर्क नष्ट करेल…’ असं पप्पू यादव म्हणाले होते. सध्या सर्वत्र पप्पू यादव यांना आलेल्या धमकीची चर्चा रंगली आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या

ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर तीन जणांनी गोळीबार करत बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप 10 आरोपींना अटक केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर काही तासांत लॉरेन्स बिश्नोई याने जबाबदारी स्वीकारली. सोशल मीडियावर एक पोस्ट करत लॉरेन्स यांने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सलमान खान याची कोणी मदत केल्यास, त्याने स्वतःता हिशेब करून ठेवावा… अशी धमकी देखील सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई याने दिली आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.