प्रसिद्ध अभिनेत्रींच नाही तर, संजय दत्त याच्या दुसऱ्या पत्नीला देखील डेट केलय ‘या’ खेळाडूने
खासगी आयुष्यामुळे प्रसिद्ध खेळाडू अनेकदा अडकला वादाच्या भोवऱ्यात; संजय दत्त याच्या दुसऱ्या पत्नीने खेळाडूवर गंभीर आरोप केल्यानंतर; खेळाडूच्या आयुष्यात नव्या अभिनेत्रीची एन्ट्री...
मुंबई : जगातील महान टेनिसपटूंच्या पैकी एक म्हणजे भारताचे माजी टेनिसपटू लिएंडर पेस. लिएंडर पेस त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिले. लिएंडर पेस यांचं नाव एक-दोन नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींशी जोडले गेलं. लिएंडर पेस सध्या अभिनेत्री किन शर्मा हिला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. पण याआधी त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. लिएंडर पेस यांच्या एक्स-पार्टनर्सने गंभीर आरोप केले. लिएंडर पेस यांच्या एका पार्टरने तर त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारसारखे गंभीर आरोपही केले आहे. तर हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेवू.
टेनिसपटू लिएंडर पेस यांचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण अभिनेत्री महिमा चौधरी हिच्यासोबत असलेल्या टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. महिमा हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. ‘परदेस’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अभिनेत्री ‘धडकन’, ‘दिल है तुम्हारा’, ‘दाग’ यांसारख्या सिनेमांध्ये झळकली.
यशाच्या शिखरावर चढत असताना महिमा लिएंडर पेस यांच्या प्रेमात पूर्ण बुडाली होती. लिएंडर पेस आणि महिमा एकमेकांसोबत अधिक वेळ घालवू लागले. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं, पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अनेक वर्षांनंतर दिलेल्या एका मुलाखतीत महिमा चौधरीने लिएंडर पेस यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला
मुलाखतीत महिमा म्हणाली, ‘लिएंडर एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण तो चांगला माणूस नाही.’ मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिमा चौधरीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना लिएंडरने संजय दत्तची दुसरी पत्नी रिया पिल्लईला डेट करायला सुरुवात केली होती. त्यानंतर महिमा हिने लिएंडर दूर राहण्याचा निर्णय घेतला.
महिमा हिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर लिएंडर पेस आणि मॉडल रिया पिल्लई यांनी २००५ मध्ये सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला. रिपोर्टनुसार दोघे २००३ पासून एकमेकांना डेट करत होते. पण त्यावेळी रिया ही संजय दत्तची पत्नी होती आणि लिएंडर महिमा चौधरीसोबत रिलेशनशिपमध्ये होते.
त्यानंतर संजय दत्त याच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर रिया पिल्लई आणि लिएंडर पेस जवळपास ९ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघांना एक मुगली देखील आहे. अनेक एकमेकांसोबत आनंदी राहिल्यानंतर रिया हिने २०१४ मध्ये लिएंडर यांच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले. हे प्रकरण अनेक वर्ष कोर्टात सुरु होतं. त्यानंतर लिएंडर पेस आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं.
अनेक सेलिब्रिटी महिलांसोबत नाव जोडल्यानंतर लिएंडर पेस सध्या अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगत आहेत. किम आणि लिएंडर कायम सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट प्रेम व्यक्त करत असतात.