सिनेनिर्माते नरेंद्र फिरोदिया आणि राहुल नार्वेकर यांची ओटीटी इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री!
गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत.
मुंबई : गेल्या वर्षभरात आणि विशेष करुन २०२० मध्ये एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे प्रेक्षकांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे जास्त वाढू लागलाय. घरबसल्या आवडत्या भाषेतील सिनेमे, वेब सिरीज एका क्लिकवर अगदी सहजसपणे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पण जर ओटीटी हे आपल्या प्रादेशिक (हक्काच्या) भाषेत असतील तर…? प्रेक्षकांना त्यांच्या हक्काचं माध्यम मिळेल, जिथे त्यांच्या भाषेतील सिनेमे हे त्यांचं दिलखुलासपणे मनोरंजन करतील. हा मुद्दा अधोरेखित करण्यामागचा उद्देश असा आहे की, मराठी प्रेक्षकांना लवकरच त्यांच्या ओटीटीच्या माध्यमातून एक सुंदर, मनोरंजक सरप्राईज मिळणार आहे. (Letsflix’ OTT platform will come to the audience in 2021)
प्ले स्टोअरवर नऊ लाखांहून अधिक पसंती मिळालेल्या ‘लेटसअप’ या इन्फोटेनमेंट व न्यूज अॅपच्या प्रचंड यशानंतर सुप्रसिद्ध उद्योजक, ‘महाकरंडक’ समितीचे अध्यक्ष, निर्माते नरेंद्र फिरोदिया आणि स्टार्टअप स्टुडियो फाऊंडर/ संस्थापक राहुल नार्वेकर त्यांच्या ‘लेट्सफ्लिक्स’ या नव्या मराठी ओटोटीच्या निमित्ताने OTT इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नुकताच ‘लेटसअप’ या अॅपला AatmaNirbhar Bharat App Innovate Challenge अंतर्गत ‘आत्मनिर्भर अॅप पुरस्कार’ मिळाला. ओटीटीसाठी असलेली पसंती लक्षात घेता मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी देखील त्यांच्या हक्काचं ओटीटी माध्यम मराठीमध्ये घेऊन येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
नरेंद्र फिरोदिया, राहुल नार्वेकर आणि सिनेइंडस्ट्री यांचं नातं फार जुनं आहे. नरेंद्र फिरोदिया हे ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ यांसारखे अनेक प्रोजेक्ट्सचे प्रमुख आहेत.‘अहमदनगर महाकरंडक’ या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या एकांकिका स्पर्धेचे ते अध्यक्ष आणि प्रायोजक देखील आहेत. ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’ या मराठी सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे.
नरेंद्र फिरोदिया यांच्यासोबत “लेट्सफ्लिक्स”साठी असोसिएट झालेले राहुल नार्वेकर यांनी ९०च्या दशकाच्या सुरुवातीला अनुराग कश्यप आणि विजय मौर्या यांसारख्या नामांकित सिनेनिर्मात्यांसह पटकखा लेखक म्हणून करियरची सुरुवात केली होती. नंतर त्यांनी fashionandyou.com आणि indianroots.com या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सचे त्यांनी सीईओ म्हणून काम सांभाळले आहे. ‘इंडिया नेटवर्क’ आणि ‘स्टार्टअप स्टुडिओ’चे ते फाऊंडर आहेत.
स्वतंत्र ओटीटी सुरु करणे हे चॅलेंजिंग तर आहेच पण या माध्यमातून मराठी टॅलेंटसाठी व्यासपीठ उपलब्ध होईल, असं सांगताना नरेंद्र फिरोदिया यांनी पुढे म्हटले की, “कोणतीही नवीन गोष्ट सुरु केली की चॅलेंजेस तर असतातच, कारण ती तुमची नवीन सुरुवात असते. तसेच ‘लेट्सफ्लिक्स’चं देखील आहे. पण आमच्या ओटीटीला उत्तम टीम लाभली आहे त्यामुळे आम्हांला आशा आहे की आम्ही सर्व चॅलेंजेंस नक्की पूर्ण करु आणि प्रेक्षकांना बेस्ट अनुभव देण्याचा प्रयत्न करु. आपल्या भारतात प्रत्येक राज्याची फिल्म इंडस्ट्री आहे. आम्ही रिजनल कॉन्टेंटवर जास्त भर देणार आहोत आणि सुरुवात मराठीपासून करत आहोत. ज्यांना सिनेमा, वेब सिरीज, शॉर्ट फिल्म बनवायची आहे किंवा तयार आहे पण प्रदर्शित कुठे करायची याचा विचार करत आहेत किंवा ज्यांच्याकडे कॉन्टेंट आहे अशा टॅलेंटसाठी ‘लेट्सफ्लिक्स’ हा प्लॅटफॉर्म असेल.”
लेट्सफ्लिक्स हे मराठी ओटीटी चालू करण्यामागील कल्पना नक्की काय, याविषयी सांगताना राहूल नार्वेकर यांनी म्हटले की, “आमचं लेट्सअप नावाचं इंन्फोटेनमेंट ऍप आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्याकडे एकूण ९ लाख युजर्स आहेत आणि विशेष करुन मराठी लोकांची संख्या त्यात जास्त आहे. गेल्या वर्षभरात आमच्या असं लक्षात आलं की लोकं व्हिडीयो फॉरमॅटला जास्त प्राधान्य देतात. मराठीसाठी स्वतंत्र असा ओटीटी प्लॅटफॉर्म नाही आणि ही गॅप आम्हांला भरायची होती. लेट्सअपचे युजर्स हे भारताबाहेरही आहेत, त्यामुळे तिथे राहणारी नवीन मराठी पिढी, ज्यांचा जन्म परदेशात झाला आहे. त्यांच्यामध्ये मराठी सिनेमा, गाणी यांची आवड निर्माण व्हावी. थोडक्यात मराठीपण भारताबाहेर ही जपले जावे हा या मागचा उद्देश.”
नवंकोरं मराठमोळं ‘लेट्सफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्म २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या :
Dilip Kumar | दिलीप कुमार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचे चाहत्यांना आवाहन
Durgamati | बिन रांझे की ‘हीर’ हुई मैं…या भूमी पेडणेकरच्या गाण्याने चाहत्यांची मने जिंकली
(Letsflix’ OTT platform will come to the audience in 2021)