Coolie No. 1 | निर्मात्यांची धूर्त खेळी, ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरमधून ‘डिसलाईक’चे बटण गायब!

चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

Coolie No. 1 | निर्मात्यांची धूर्त खेळी, ‘Coolie No. 1’च्या ट्रेलरमधून ‘डिसलाईक’चे बटण गायब!
Follow us
| Updated on: Nov 28, 2020 | 5:43 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि सारा अली खान आगामी ‘कुली नंबर 1’ (Coolie No. 1) प्रदर्शनाच्या तयारीला लागले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलरच्या रिलीजला 2 तासापेक्षा जास्त वेळ गेला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला 4 लाख 80 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र, यापेक्षाही अधिक चर्चा आहे ती म्हणजे ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरमधून गायब असणाऱ्या ‘लाईक/डिसलाईक’ (Like Dislike) बटणाची! ‘कुली नंबर 1’ची टीम ट्रोलर्सला खूपच घाबरली आहे (Like and Dislike option hide from Coolie no1 trailer).

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून लाईक आणि डिसलाईक ऑप्शन हटवले गेले आहेत. सुशांत सिंह राजपूतच्या फॅन क्लबने गेल्या अनेक दिवसांपासून सारा अली खानला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. बरेच ट्विटर वापरकर्ते या चित्रपटाचा ट्रेलरला डिसलाईक करण्याविषयी चर्चा करत होते. तर, दुसरीकडे अनेक लोक या चित्रपटाची खिल्ली उडवत होते. यामुळेच चित्रपटाच्या टीमने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

(Like and Dislike option hide from Coolie no1 trailer).

सारा अली खान ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि अभिनेता वरूण धवन (Varun Dhawan) यांचा आगामी चित्रपट ‘Coolie No. 1’ हा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, आता सुशांतच्या चाहत्यांनी सारावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘डिसलाईक’ करण्यासाठीची मोहीम सुरू केली होती. चित्रपटासह सारा अली खानवर बंदी घालण्याची मागणी केली जात होती.

ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘कुली नंबर 1’च्या ट्रेलरवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुशांतच्या चाहत्यांनी केली होती.  ‘साराच्या विरोधात अद्याप ड्रग प्रकरणी केस चालू आहे, तर चित्रपट कसा येऊ शकतो?’, असा प्रश्न काही वापरकर्त्यांनी विचारला आहे. तर, साराने सुशांतचा विश्वासघात केल्याचे काही वापरकर्ते म्हणत आहेत (Like and Dislike option hide from Coolie no1 trailer).

कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे डिजिटल प्रदर्शन

डेव्हिड धवन दिग्दर्शित ‘Coolie No 1’ हा चित्रपट 25 डिसेंबरला अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून साला अली खान आणि वरुण धवन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट 1 मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून देशभरातील चित्रपटगृह बंद होती.

चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अनेक महिने वाट पाहिली, परंतु कोरोनाची परिस्थिती अद्याप सुधारलेली नाही. त्यामुळे अखेर निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चित्रपटात वरुण आणि सारासह परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘कुली नंबर 1’ हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्याच 1995 साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर वन’ चित्रपटाचा रिमेक आहे. जुन्या चित्रपटात अभिनेता गोविंदा, अभिनेत्री करिष्मा कपूर, कंचन, कादर खान, शक्ती कपूर आणि हरीश कुमारसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

(Like and Dislike option hide from Coolie no1 trailer)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.