‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट OTT वर प्रदर्शित;कुठे अन् कधी पाहता येणार?

अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट मागच्या महिन्यात 18 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आवडली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेच आणि कलाकारांचे कौतुकही केले होते. व्लॉगरच्या रहस्यमय आणि जगातील कथा सांगणारा असा हा चित्रपट होता. ज्यांना हा चित्रपट पाहयला मिळाला नव्हता ते आता घरबसल्या हा चित्रपट पाहू […]

‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट OTT वर प्रदर्शित;कुठे अन् कधी पाहता येणार?
Like and Subscribe movie released on OTT
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 6:57 PM

अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट मागच्या महिन्यात 18 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आवडली होती. प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेच आणि कलाकारांचे कौतुकही केले होते. व्लॉगरच्या रहस्यमय आणि जगातील कथा सांगणारा असा हा चित्रपट होता. ज्यांना हा चित्रपट पाहयला मिळाला नव्हता ते आता घरबसल्या हा चित्रपट पाहू शकणार आहेत. कारण ‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट OTT वर प्रदर्शित होत आहे.

‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट प्राईम व्हिडीओवर 

‘लाईक आणि सबस्क्राईब’चित्रपट OTT वर प्रदर्शित होत असून प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. चित्रपटाची कथा नक्कीच शेवटपर्यंत खिळवून ठेवते. चित्रपटात अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, आणि विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, . नितीन वैद्य प्रॉडक्शन्स आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे.

चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचं झालं तर, या चित्रपटाची कथा गावाहून मुंबईत आलेल्या तरुणाची आहे. झटपट पैसा मिळवण्याच्या शोधात असणारा आणि त्यासाठी विविध युक्त्या शोधून काढणारा रोहिदास मुंबईत आल्यानंतर अशा पद्धतीने पैसा कमवण्यासाठी काय करता येईल याचं प्लानिंग करत असतो.

शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा

त्याला तसे साथीदारही मिळत जातात. त्यातूनच पुढे फुलत जाणारी ही कथा आहे.तसेच सध्या सुरु असेलेलं तरुणाईमधलं व्लॉगरचं आयुष्य आणि त्यातून घडत गेलेली एक कथा यावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामुळे कथेचा विषय हा नक्कीच काहीतरी सांगणारा असून तो हलक्या-फुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तसेच चित्रपटातील रंजकता हरवणार नाही याची काळजी चित्रपटाच्या टीमने घेतल्याचे दिसून येते.

चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरूकर यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत लिहिलं आहे की, ” “प्रेक्षक आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्राईम व्हिडीओवर पाहू शकतात. या चित्रपटातून व्लॉगरच्या आयुष्यातील रहस्य आणि थरार पाहाणे प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरेल,”, असं म्हणत मेरूकर यांनी प्रेक्षकांना OTT वर या चित्रपटाचा आनंद घेण्यास सांगितलं आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.