AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: Bachchan Family Corona | खासदार जया बच्चन, कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली यांचे रिपोर्ट निगेटिव्ह

महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला (Amitabh Bachchan Corona Positive) आहे.

LIVE: Bachchan Family Corona | खासदार जया बच्चन, कन्या श्वेता बच्चन-नंदा, नात नव्यानवेली यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
Follow us
| Updated on: Jul 12, 2020 | 3:07 PM

Amitabh Bachchan Corona मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला (Amitabh Bachchan Corona Positive) आहे. बच्चन पिता-पुत्रांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांच्या देखील कोरोना चाचणी करण्यात  कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बच्चन पिता-पुत्रांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात अभिनेत्री ऐश्वर्या रायचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अमिताभ यांच्या पत्नी खासदार जया बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

LIVE Updates

    • ऐश्वर्या आणि आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण
    • बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तब्येतीतील सुधारणेसाठी चाहत्यांकडून कांदिवलीमधील मिथिला हनुमान मंदिरात हवन पूजा
    • अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणेसाठी मुंबईतील कांदिवली भागात महामृत्युंजय यज्ञ https://t.co/F5maSOU3VD #AmitabhBachchan #AmitabhBachchanCovidPositive pic.twitter.com/D1hdpbwzVM — TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2020

  • मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये नव दुर्गा मंदिर टीटी नगरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना आणि रुद्राभिषेक.
  • सर्व मार्गदर्शक सूचना पाळल्याबद्दल आणि नागरिकांना आवाहन केल्याबद्दल बीएमसीकडून अभिषेक बच्चन यांचे आभार
  • बंगला निर्जंतुकीकरणासाठी बीएमसीची कर्मचारी जलसाबाहेर, सुरक्षा रक्षकांकडून प्रवेश नाही, 20 मिनिटांपासून कर्मचारी प्रतिक्षेत
  • जलसा, जानकी या बंगल्यांचं दररोज निर्जंतुकीकरण, बीएमसी अधिकारी प्रवीण विठोबा जाधव यांची माहिती
  • अमिताभ बच्चन यांना सौम्य ताप, ऑक्सिजनची पातळी सामान्य
  • जलसामध्ये मुंबई महापालिकेकडून थोड्याच वेळात निर्जंतुकीकरण होणार, इतर कर्मचाऱ्यांच्याही टेस्ट केल्या जाणार
  • अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना नानवती रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत – जनसंपर्क अधिकारी (नानावती रुग्णालय)
  • अमिताभ बच्चन याचं घर मुंबई महानगरपालिकेच्या के वेस्ट वार्डात (BMC K West Ward) येतं. या वार्डात आतापर्यंत एकूण 5 हजार 300 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी सध्या 1 हजार 445 सक्रीय रुग्ण आहेत. या वार्डात आतापर्यंत 241 जणांचा मृत्यू झाला आहे.

अभिषेक बच्चन यांचे ट्विट

“माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती ट्विट करत अभिषेक बच्चन यांनी दिली.

अमिताभ बच्चन यांचे ट्विट

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच माझ्या कुटुंबाला आणि घरातील इतर स्टाफच्याही कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही,” असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

“तसेच गेल्या दहा दिवसात माझ्या संपर्कात जे व्यक्ती आले त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी,” असेही बिग बींनी  ट्विटमध्ये म्हटले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अनेक कलाकारांनी रिट्विट करत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. सोनम कपूर, क्रिती खरबंदा, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यासारख्या अनेक कलाकारांनी ट्विटवर रिट्विट केलं आहे.

त्यांच्या ट्विटरवर आतापर्यंत जवळपास 56 हजार रिट्विट करण्यात आले आहे. तसेच अनेक चाहते अमिताभ यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

संबंधित बातम्या :

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन आणि अभिषेकला कोरोना

Amitabh Bachchan Corona | अमिताभ बच्चन यांच्यासाठी पाकिस्तानातही दुवा, शोएब अख्तरचीही प्रार्थना

Bachchan Family Corona report: जया बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्याचा कोरोना अहवाल निगेटीव्ह

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.