Lock Upp: पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल मंदाना करीमीचा धक्कादायक खुलासा, “ओळखीतल्या प्रत्येकीशी त्याचे शरीरसंबंध..”
अभिनेत्री मंदाना करीमीने (Mandana Karimi) जेव्हापासून 'लॉक अप' (Lock Upp) या शोमध्ये प्रवेश केला आहे, तेव्हापासून ती सतत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध खुलासे करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये मंदाना तिच्या वैवाहित आयुष्याबद्दल व्यक्त झाली.
अभिनेत्री मंदाना करीमीने (Mandana Karimi) जेव्हापासून ‘लॉक अप’ (Lock Upp) या शोमध्ये प्रवेश केला आहे, तेव्हापासून ती सतत तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित विविध खुलासे करत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये मंदाना तिच्या वैवाहित आयुष्याबद्दल व्यक्त झाली. मॉडेल अझ्मा फलाहशी (Azma Fallah) बोलताना तिने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल धक्कादायक खुलासा केला. “माझं वयाच्या 27व्या वर्षी लग्न झालं. आम्ही अडीच वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्न केलं. लग्नानंतर घडलेल्या काही घटनांमुळे आम्ही काही काळ वेगळे राहू लागलो. गेल्या वर्षी मी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पार पडली. जेव्हा आम्ही वेगळे राहत होतो, त्या चार वर्षांच्या काळात त्याने मी ओळखत असलेल्या प्रत्येकीशी शरीरसंबंध ठेवले होते,” असं तीने अझ्माला सांगितलं.
मंदानाचं ऐकून अझ्माला धक्काच बसला. तिने विचारलं, “तुझ्या मैत्रिणींसोबतही का?” त्यावर मंदाना म्हणाली, “माझ्या मैत्रिणी नव्हत्या.” त्याने तिला आधी घटस्फोट का दिला नाही असं विचारलं असता, मंदाना म्हणाली की हे तिचं गुपित आहे, जे कोणालाच माहीत नाही.
“लग्नाआधी माझ्या बॉयफ्रेंडची आई मला फुलं आणि डोनट्स पाठवायची. आम्ही अगदी कॉफी, शॉपिंग, पार्ट्या आणि स्पा सेशन्ससाठीही एकत्र जायचो. मी कुठेही एकटी जाणार नाही याची खबरदारी त्या घ्यायच्या. मी एकटीच बाहेर गेले तरी त्या तिथल्या सगळ्यांना फोन करून विचारायच्या की मी खरंच त्या ठिकाणी आहे का? लग्नानंतर अचानक हे सर्व बदललं. फक्त सलवार-कमीज घाल, मंदिरासमोर बस, असं ते मला सांगू लागले. मला माझ्या मैत्रिणींसोबत बोलण्यापासून अडवलं जायचं. तुमचे मित्र किंवा कुटुंबीय कसेही असले तरी जोपर्यंत तुमचा पार्टनर तुमची साथ देत नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही”, असं मंदाना म्हणाली.
लॉक अप या शोचा प्रोमो-
View this post on Instagram
मंदाना करीमीने जानेवारी 2017 मध्ये गौरव गुप्तासोबत लग्न केलं. जुलै 2017 मध्ये तिने त्याच्या आणि त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. पण ऑगस्ट 2017 मध्ये तिने ही तक्रार मागे घेतली.
हेही वाचा:
Priya Bapat: ‘आता काय ऐकत नाय आपन’; प्रिया बापटच्या फोटोशूटवरील जितेंद्र जोशीच्या कमेंटने वेधलं लक्ष