अभिनेता विजय बाबूविरोधात लूकआऊट नोटीस जारी; अभिनेत्रीकडून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

कोची शहर पोलिसांनी मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबूसाठी (Vijay Babu) लूकआउट नोटीस (Lookout notice) जारी केली. विजयवर एका चित्रपटाच्या अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे.

अभिनेता विजय बाबूविरोधात लूकआऊट नोटीस जारी; अभिनेत्रीकडून लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल
Vijay BabuImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 1:30 PM

कोची शहर पोलिसांनी मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबूसाठी (Vijay Babu) लूकआउट नोटीस (Lookout notice) जारी केली. विजयवर एका चित्रपटाच्या अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. डीसीपी यूव्ही कुरियाकोसे यांनी यापूर्वी सांगितलं होतं की आरोपांनंतर विजय फरार होता आणि त्याच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता विजय बाबूने आपण फरार नसून दुबईत असल्याचा दावा केला आहे. कडवंथरा इथल्या नक्षत्र हॉटेल आणि अभिनेत्याच्या अपार्टमेंटवरही पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी जप्त केल्याचं कळतंय. विजय भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल. जर तो दीर्घकाळ परदेशात राहिल्यास त्याच्या अटकेसाठी इंटरपोलची (Interpol) मदत घेतली जाणार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण काहीही चुकीचं केलं नसल्याचं सांगत विजयने सर्व आरोप फेटाळून लावले होते. इतकंच नव्हे तर संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. “मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही”, असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला होता. अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी 22 एप्रिल रोजी विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर 26 एप्रिलच्या रात्री विजय बाबूने फेसबुक लाईव्हद्वारे त्याच्यावरील आरोपांबाबत प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणात तोच पीडित असल्याचं म्हटलं होतं. या लाईव्हदरम्यान त्याने पीडितेचं नावंही सांगितलं होतं.

काय म्हणाला विजय बाबू?

“मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी शेअर करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला तिच्या कुटुंबीयांचं नुकसान करायचं नाही. मी फक्त माझी पत्नी, आई, बहीण आणि मित्रांना उत्तर देण्यास बांधिल आहे. ‘विजय बाबू दोषी नाही’ अशा छोट्याशा बातमीने हे सर्व संपू नये असं मला वाटतं. ती माझ्याकडे ऑडिशनसाठी आली होती आणि तिला भूमिका मिळाली. हे सर्व झाल्यानंतर आता ती कास्टिंग काउच आणि इतर गोष्टींबद्दल बोलतेय, याचा त्रास मला होत आहे. तिने मला नैराश्यात असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर ते मार्च 2021 पर्यंतचे तिचे सर्व मेसेज माझ्याकडे आहेत. 400 हून अधिक स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. तिचे जे काही आरोप आहेत, मग ते बलात्कार किंवा सहमतीने असो, ते सर्व माझ्याकडे रेकॉर्डवर आहे” असं तो फेसबुक लाईव्हदरम्यान म्हणाला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.