LOVE LIFE | प्रेमासाठी एकटीच साता समुद्रापार गेली अभिनेत्री; परदेशात घडलेली घटना धक्कादायक

LOVE LIFE | आयुष्यातील खास व्यक्तीसाठी 'या' अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा, त्याच्यासाठी साता समुद्रापार पोहोचली, पण तिने अनुभवला धक्कादायक प्रसंग...

LOVE LIFE | प्रेमासाठी एकटीच  साता समुद्रापार गेली अभिनेत्री; परदेशात घडलेली घटना धक्कादायक
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 11:33 AM

मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलं तर आपण, त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवतो. त्या व्यक्तीच्या आवडी – निवडींचा विचार करतो… सतत आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीसाठी काही तरी खास करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, ती व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते. समोरच्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत… इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्रेमात आदर आणि विश्वास फार महत्त्वाचा असतो.. विश्वासाच्या जोरावर कोणतंही नातं घट्ट होतं. पण प्रत्येक नात्यात आदर आणि विश्वास असतोच असं नाही. ज्यामुळे नात्यात प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तीला अनेक गोष्टींचा त्रास सहन कराला लागतो..

आता देखील अशाच एका अभिनेत्रीच्या लव्हस्टोरीबद्दल चर्चा रंगत आहे. जिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, छोट्या पडद्यावर देखील मोठी कामगिरी केली. पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीला अनेक चढ-उतारांचा समाना करावा लागला. बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री फक्त प्रेमासाठी परदेशात बॉयफ्रेंडला सरप्राईझ देण्यासाठी गेली. पण परदेशात गेल्यानंतर अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.. परदेशात गेल्यानंतर आलेला अनुभव खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखातीच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केला.

प्रेमात अभिनेत्रीने ओलांडल्या सर्व मर्यादा

प्राची देसाई तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीला भेटण्यासाठी परदेशात पोहोचली होती. पण अभिनेत्रीचा एक्स-बॉयफ्रेंड देशातच नव्हता. प्राची म्हणाली, ‘मी पहिल्यांदा कोणासाठी तरी एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास केला होता. जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो मुलगा त्याच देशात होता. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला भेटण्यासाठी गेली… तेव्हा तो तिकडे नव्हता…’ ज्यामुळे प्राची हिला मोठा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

पण परदेशात पोहोचल्यानंतर अभिनेत्री खोलीत रडत न बसता फिरण्याचा आनंद लूटला. प्राची देसाई कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज अभिनेत्रीचा वाढदिवस असल्यामुळे तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत. प्राची देसाई हिने ‘कसम से’ सिनेमाच्या माध्यमातून टीव्ही विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर प्राची देसाई हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.

महत्त्वाचं म्हणजे छोट्या पडद्यावर स्वतःच्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्राची देसाई हिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. एवढंच नाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्री दिसली. सोशल मीडियावर देखील प्राची कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील प्राची हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.