Love Life : ‘या’ क्रिकेटपटूसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल; आता करते तरी काय?

Love Life : कुटुंबियांना कंटाळून अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय आणि केलं या' क्रिकेटपटूसोबत लग्न, पण लग्नानंतर अभिनेत्रीला मोजावी लागली मोठी किंमत... वयाच्या ५० व्या वर्षी काय करते 'ही' अभिनेत्री? सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा, एकेकाळी करत होती बॉलिवूडवर राज्य...

Love Life : 'या' क्रिकेटपटूसोबत लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल; आता करते तरी काय?
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 9:52 AM

मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्याचं नाव प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत जोडण्यात आलं. पण काही अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही, तर काही मात्र वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. आता देखील अशा अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, जिने क्रिकेटपटूसोबत लग्न तर केलं, पण लग्नानंतर गायब झाली. सांगायचं झालं तर बॉलिवूडमध्ये ९० व्या दशकात अनेकांनी पदार्पण केलं. काही सेलिब्रिटी आजही झगमगत्या विश्वात सक्रिय आहेत, तर काहींनी मात्र बॉलिवूडला निरोप दिला. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे फरहीन प्रभाकर … बॉलिवूडमध्ये ‘माधुरी दीक्षित नंबर 2’ म्हणून फरहीन प्रभाकर हिची ओळख होती.

फरहीन प्रभाकर हिने ९० व्य दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण करियरच्या उच्च शिखरावर पोहोचताच अभिनेत्री बॉलिवूडला राम-राम ठोकला. जेव्हा फरहीन हिने बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली, तेव्हा तिची तुलना अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत होवू लागली.

फरहीन प्रभाकर हिचं सौंदर्य आणि अभिनय पाहून चाहत्यांनी तिला डोक्यावर घेतलं. पण अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय घेत लग्न केलं. फरहीन हिने माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांच्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्यानंतर अभिनेत्रीने तिचा संपूर्ण वेळ कुटुंबाला दिला.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, फरहीन हिच्या कुटुंबात सतत वाद व्हायचे म्हणून तिने सुखी संसाराचं स्वप्न पाहिलं होतं. म्हणून लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनय करणं सोडलं आणि स्वतःचं पूर्ण लक्ष कुटुंबावर केंद्रीत केलं. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने एका मुलाखतीत मनोज प्रभाकर यांच्यासोबत का लग्न केलं? याचा खुलासा केला.

मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘मला हिंदू मुलासोबतच लग्न करायचं होतं. कारण मला मुस्लीम पुरुषांवर विश्वास नाही.’ वडिलांनी तीन लग्न केल्यामुळे अभिनेत्री असं म्हणाली. आता फरहीन वयाच्या ५० व्या वर्षी कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. एवढंच नाही तर, मनोज प्रभाकर यांनी देखील क्रिकेटविश्वातून संन्यास घेतला आहे. सध्या सर्वत्र फरहीन प्रभाकर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे.

बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगलेल्या असतात. महत्त्वाचं म्हणजे, जे सेलिब्रिटी आहे झगमगत्या विश्वापासून दूर आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.