Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान-ऐश्वर्या जेव्हा एकमेकांसमोर येतात… व्हिडिओ पाहून चाहते म्हणतात ‘आँखों में चुभता कल का धुआँ..’

अनेक वर्षांनंतर आजही जेव्हा सलमान-ऐश्वर्या एकमेंकासमोर येतात, तेव्हा... व्हायरल व्हिडीओमुळे पुन्हा दोघांच्या नात्याची चर्चा... व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल...

सलमान-ऐश्वर्या जेव्हा एकमेकांसमोर येतात... व्हिडिओ पाहून चाहते म्हणतात 'आँखों में चुभता कल का धुआँ..'
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 12:39 PM

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील सलमान-ऐश्वर्या यांचे असंख्य फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सलमान-ऐश्वर्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ऐश्वर्या हिची मुलगी आराध्या देखील दिसत आहे. हा व्हिडीओ उद्योजक मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याच्या साखरपुड्याच्या दरम्यानचा आहे. अनंत यांच्या साखरपुड्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील मुलगी आराध्या बच्चन हिच्यासोबत अंबानी कुटुंबातील लहान मुलाच्या साखरपुड्यात उपस्थित होते.

अनेक कार्यक्रमांमध्ये सलमान आणि ऐश्वर्या उपस्थित असतात. पण नात्यात आलेल्या वादळानंतर दोघे कधीही एकत्र दिसले नाहीत. सध्या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि सलमान एकमेकांना पाहून ‘हाय’ करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आराध्या देखील दिसत आहे.

सलमान-ऐश्वर्या यांचा हा व्हिडीओ thetimelineindia या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इडिट करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांनापाहून हसताना दिसत आहेत. व्हिडीओ खोटा असला तरी अनेक चाहते सलमान-ऐश्वर्या यांच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेटंचा वर्षाव करत आहेत.

सलमान-ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल सांगायाचं झालं, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालं. सलमानपासून विभक्त झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांची जोडी बॉलिवूडमधील बेस्ट कपलपैकी एक आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. तर दुसरीकडे सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना डेट केलं, पण आजही अभिनेता सर्वकाही असून एकटा आहे.

सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.अभिनेता गेल्या काही दिवसांपासून आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.