सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर लव सिन्हाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अखेर फॅमिली…

| Updated on: Jul 10, 2024 | 11:36 AM

शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांचा आज लग्नाचा 44 वा वाढदिवस आहे. सोनाक्षी सिन्हा हिने देखील झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले. या लग्नाला सुरूवातीला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याचे सांगितले गेले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नानंतर लव सिन्हाने घेतला अत्यंत मोठा निर्णय, अखेर फॅमिली...
Sonakshi Sinha
Follow us on

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नामुळे तिचे कुटुंबिय नाराज असल्याचे जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. मात्र, लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हा हिने वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडला होता. आई आणि वडील दोघेही सोनाक्षी सिन्हा हिच्या शेजारीच उभे होते. लग्नानंतर रात्री मुंबईमध्ये खास पार्टीचे आयोजन देखील सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नामध्ये तिचे दोन्ही भाऊ लव आणि कुश दिसले नाहीत. सोनाक्षी सिन्हाला आई वडिलांची नाराजी दूर करण्यात यश मिळाले. परंतू भावांची नाराजी अजूनही सोनाक्षी दूर करू शकली नाहीये.

आज सोनाक्षी सिन्हा हिचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांचा 44 वा लग्नाचा वाढदिवस आहे. आता आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी लव सिन्हा याने सोशल मीडियावर एक अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केलीये. मात्र, ही पोस्ट पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या पोस्टनंतर शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबातील वाद देखील पुढे येताना दिसत आहे.

लव सिन्हाने आई वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केलीये. यासोबतच त्याने एक फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, कुश सिन्हा आणि लव दिसत आहे. मात्र, या फॅमिली फोटोमध्ये कुठेही सोनाक्षी सिन्हा ही दिसत नाहीये. लग्नामध्येही कुठेही लव दिसला नव्हता. हेच नाहीतर सोनाक्षीच्या सासऱ्यांविरोधातही एक पोस्ट लवने शेअर केली होती. मात्र, काही वेळात त्याने ती डिलीटही केली.

लव सिन्हा याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, माझ्या शानदार पालकांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा..आम्ही खरोखरच खूप जास्त भाग्यशाली आहोत की, तुम्ही आमचे पालक आहेत. आम्ही तुमच्यासोबत जितके पण आयुष्य जगले आहे, त्यासाठी भाग्यवान आहोत. आई वडिलांसाठी लव सिन्हा याने सोशल मीडियावर अत्यंत खास अशी पोस्ट शेअर केलीये.

आता लव सिन्हा याने शेअर केलेली ही पोस्ट पाहून विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. लव सिन्हा हा सोनाक्षीवर चांगलाच नाराज असल्याचे बघायला मिळतंय. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्षे एकमेकांना डेट करून लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. लग्नानंतर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा ही दिसत आहे.