संयुक्त अरबमधील दुबई हे सर्वात मोठं शहर आहे आणि हे शहर बॉलीवूड कलाकारांचं सर्वाधिक आवडतं शहर आहे. बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार आहेत ज्यांची दुबईमध्ये त्यांची आलिशान घरं आहेत.
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान मुंबईतील एका आलिशान बंगल्यात राहतो. त्याच्या मुंबईच्या बंगल्याचे नाव मन्नत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याचा दुबईमध्येही व्हिला आहे. अभिनेताचा हा व्हिला पाम जुमेराहमध्ये आहे, याची किंमत 2.8 दशलक्ष आहे, जे सुमारे 20 कोटी आहे. असं म्हणतात की या भव्य व्हिलामध्ये सुंदर 6 बेडरूम आहेत.
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं ब्रिटिश आणि भारतीय वंशाचे व्यापारी राज कुंद्रा यांच्याशी लग्न केलं आहे. दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये या जोडप्यानं स्वत:साठी एक आलिशान घर घेतलं आहे.
जुमिराह मधील सेंचुरी फॉल्समध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय (Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan) यांचं घर आहे. प्रोपहेडलाईननुसार या मालमत्तेची किंमत 15 ते 35 दशलक्ष यूएई दिरहॅम दरम्यान आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2013 मध्ये लक्झरी घर खरेदी केलं.
आपली टीव्ही मालिका 24च्या शूटिंग दरम्यान अनिल कपूर यांनी 2016 मध्ये दुबईत स्वत:साठी 2 बीएचके फ्लॅट घेतला होता.
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा दुबईशी खूप चांगला संबंध आहे. त्याचे अनेक मित्र तिथे आहेत. शहराच्या मध्यभागी त्याचा एक फ्लॅट आहे.
सोहेल खान सध्या चित्रपटांपासून दूर असला तरी या अभिनेत्याकडे मुंबईपासून दुबईपर्यंत अनेक मोठ्या संपत्ती आहेत. सोहेलचा दुबईच्या बिझनेस बे येथे फ्लॅट आहे.