बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का; ‘बाजीराव मस्तानी’ फेम सेलिब्रिटीचं निधन

बॉलिवूड कलाकारांवर दुःखाचं डोंगर; 'बाजीराव मस्तानी' फेम सेलिब्रिटीचं निधन, निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही.

बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का; 'बाजीराव मस्तानी' फेम सेलिब्रिटीचं निधन
बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का; 'बाजीराव मस्तानी' फेम सेलिब्रिटीचं निधन
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 11:40 AM

मुंबई : बॉलिवूड मधून एक वाईट बातमी समोर येत आहे. अनेक सिनेमांसाठी ज्यांनी गाण्यांचं लेखण केलं त्या प्रसिद्ध गीतकाराचं निधन झालं आहे. गीतकार नासिर फराझ यांचं निधन झालं आहे. ज्यामुळे कलाविश्वात खळबळ माजली आहे. नासिर फराझ यांनी २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काईट्स’ सिनेमातील ‘दिल क्यों मेरा शोर करे’ आणि ‘जिंदगी दो पल की’ या गाण्यांचं फक्त लेखणच केलं नव्हतं तर, त्यांनी या दोन प्रसिद्ध गाण्यांना आवाज देखील दिला. याशिवाय नासिर फराझ यांनी दिवंगत गायक केके यांच्यासोबत ‘बाजीराव मस्तानी’, ‘कृष आणि काबिल’ यांसारख्या सिनेमांसाठी गाणी लिहिली.

नासिर फराझ यांच्या निधनानंतर कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. नासिर फराझ यांचे मित्र आणि प्रसिद्ध गायक मुज्तबा अजीज यांनी दिलेल्या माहितीनुसार नासिर फराझ यांना हृदया संबंधी काही आजार होते. ७ वर्षांपूर्वी त्यांची सर्जरी देखील झाली होती. रविवारी संध्याकाळी त्यांच्या छातीत दुखत होत होतं. पण तरी देखील नासिर फराझ रुग्णालयात गेले नाहीत.

अखरे रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांचं निधन झालं. निधनानंतर बॉलिवूड आणि संगीत विश्वाला मोठा धक्का बसला आहे. अनेक सेलिब्रिटींनी नासिर फराझ यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. सध्या नासिर फराझ यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नासिर फराझ यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध कव्वाल आणि पाश्वगायक मुज्तबा अझीझ नाझा (Mujtaba Aziz Naza) यांनी फेसबूकवर भावना व्यक्त करत दिली. सध्या मुज्तबा अझीझ नाझा यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही, तर मुज्तबा अझीझ नाझा यांनी नासिर फराझ यांच्यासोबत काढलेला शेवटचा फोटो देखील पोस्ट केला आहे.

नासिर फराझ हे बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांनी काइट्स, कृष यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं. शिवाय २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या काबिल आणि २०१७ साली प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानी सिनेमासाठी त्यांनी एकापेक्षा एक गाणी लिहिली.

नासिर फराझ यांनी ‘तुम मुझे बस यूं ही’ , ‘मैं हूं वो आसमान’, ‘कोई तुमसा नहीं’, ‘काबिल हूं’ आणि ‘चोरी चोरी चुपके’ यांसारखी अनेक हीट गाणी बॉलिवूडला दिली. नासिर फराझ संगीतकार आणि संगीत निर्देशक देखील होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.