अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचे पती डॉक्टर श्रीराम नेने सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेने आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या टिप्स देत असतात. अभिनेत्रीच्या पतीबद्दल सांगायचं झालं तर, श्रीराम नेने कार्डियोथोरेसिक असून त्यांनी एक मोठा खुलासा केला आहे. हार्ट अटॅकबद्दल श्रीराम नेने यांनी मोठा खुलासा केला आहे. सोमवारी हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक असतो असं श्रीराम नेने यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं आहे. सध्या सोशल मीडियावर श्रीराम नेने यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Dr. Shri Ram ने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टनुसार सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक असतो. नेने यांच्या पोस्टनंतर सोमवारी हृदयविकाराचा धोका जास्त असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरला आहे. नेने यांच्या पोस्टवर नेटकरी कमेंट करत प्रतिक्रिया देत आहे.
ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF) च्या एका रिपोर्टमध्ये देखील सोमवारी हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. अन्य दिवसांपेक्षा देखील सोमवारी हृदयविकाराचा धोका 13 टक्क्यांनी अधिक असतो. या टर्मला ‘ब्लू मंडे…’ असं देखील म्हणतात.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी हार्ट अटॅकचा धोका सकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 10 वाजेपर्यंत अधिक असतो. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसली तरी सकाळी उठल्यानंतर रक्तातील कॉर्टिसोल आणि हार्मोन्स वाढल्यामुळे असे घडत असेल… असा अंदाज वर्तवण्यात येतो…
यामागे एक सर्कॅडियन रिदम हेही एक मोठे कारण असू शकते. सर्कॅडियन लय आपल्या झोपेचे आणि उठण्याचे चक्र नियंत्रित करते. तज्ज्ञांच्या मते, झोप आणि जागरण चक्रातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होतो आणि हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. असं देखील सांगितलं जातं… याआधी देखील नेने यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता.
व्हिडीओमध्ये त्यांनी शरीरासाठी कोणते तेल फायद्याचे ठरतील याबद्दल सांगितलं होतं. पाच तेल नेने यांनी सांगितले होते. राईस ब्रेने ऑईल, शेंगदाण्याचं तेल, मोहरीचं तेल, ऑलिव्ह ऑईल, तिळाचं तेल… हे पाच तेल सांगितले होते. सोशल मीडियावर नेने यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.