Madhuri Dixit | माधुरी दीक्षितने सांगितले तिच्या सौंदर्यांचे राज, दिल्या काही ब्यूटी टिप्स!

बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित चाहत्यांच्या मनावर नेहलीच राज करते. प्रत्येकाला माधुरीच्या सौंदर्याचे कुतूहल आहे. माधुरी काय खाते, काय पिते, डायट कसा करते, फिटनेस कसा राखते. या तिच्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा आहे.

Madhuri Dixit | माधुरी दीक्षितने सांगितले तिच्या सौंदर्यांचे राज, दिल्या काही ब्यूटी टिप्स!
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:24 PM

मुंबई : बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित चाहत्यांच्या मनावर नेहलीच राज करते. प्रत्येकाला माधुरीच्या सौंदर्याचे कुतूहल आहे. माधुरी काय खाते, काय पिते, डायट कसा करते, फिटनेस कसा राखते. या तिच्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येकालाच इच्छा आहे. तर बघा माधुरी आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काय करते? होय, माधुरी दीक्षितने स्वतः या बद्दल माहिती दिली आहे. माधुरीने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने त्वचा आणि सौंदर्यांच्या काही टिप्स दिल्या आहेत.(Madhuri Dixit shared the secrets of her beauty)

अभिनेत्री माधुरी दीक्षितने स्किनकेयर टिप्स दोन भागात विभागल्या आहेत. बाह्य आणि अंतर्गत त्वचेच्या काळजीबद्दल सांगितले आहे. अंतर्गत म्हणजे आपण काय खातो, काय पितो, आपली जीवनशैली कशी आहे. याबद्दल सुरूवातीला मार्गदर्शन केले आहे.

दररोज 8 ग्लास पाणी प्या पाणी आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. आपल्याला हाइड्रेटेड ठेवते, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो. यामुळे कमीत-कमी दिवसातून 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

तेलकट पदार्थ खाऊ नका तेलकट पदार्थ खाण्यामुळे आपली त्वचा तेलकट बनते, ज्यामुळे मुरुम आणि ब्लॅकहेड्स होतात. त्यामुळे तेलकट शक्यतो टाळले पाहिजे.

साखर खाऊ नका मुरुम होण्याचे मुख्य कारण साखर असू शकते. आपल्या अन्नात साखर कमी प्रमाणात ठेवा. शरीरात ग्लूकोजच्या पातळीत वाढ झाल्यामुळे मुरुमांची समस्या वाढते.

ज्युस ऐवजी फळे आणि भाज्या खा माधुरी म्हणाली म्हणते एका फळामध्ये फायबरचे प्रमाण एका ज्युसच्या ग्लासपेक्षा जास्त असते. म्हणूनच तुम्ही जेवणामध्ये फळे आणि भाज्या खाव्या.

पुरेशी झोप घ्या दररोज सुमारे 7 ते 8 तास झोप आवश्यक आहे. 7 ते 8 तास झोप झाली तर आपली त्वचा ताजी राहते.

दररोज व्यायाम करा आपल्या त्वचेला चमक येण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करणे सर्वात महत्वाचे आहे. व्यायामामुळे तुम्ही निरोगी राहता. बाह्य घटकाविषयी माधुरी म्हणाली, झोपेच्या अगोदर नेहमी मेकअप काढून टाकला पाहिजे. झोपेच्या आधी आपला चेहरा स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे.

संबंधित बातम्या : 

वर्कआऊट कसं करावं, कतरिना कैफचे धडे, सोशल मीडियावर वर्कआऊट रुटीन शेअर

रिंकू राजगुरुच्या चाहत्यांसाठी Good News, ‘या’ हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

(Madhuri Dixit shared the secrets of her beauty)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...