माधुरी दीक्षित आज असती ‘या’ राजघराण्याची सून, कुटुंबियांच्या विरोधामुळे ‘अधुरी प्रेम कहाणी…’

Madhuri Dixit : नेने नाही तर, 'या' राजघराण्याची सून असती बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित... पण कुटुंबियांनी नाही मान्य केलं दोघांचं नातं... बॉलिवूडची एक 'अधुरी प्रेम कहाणी...', फार कमी लोकांना माहिती आहे, माधुरी 'हे' प्रेमप्रकरण...

माधुरी दीक्षित आज असती 'या' राजघराण्याची सून, कुटुंबियांच्या विरोधामुळे 'अधुरी प्रेम कहाणी...'
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 12:56 PM

मुंबई | 30 जानेवारी 2024 : प्रेम… ही एक गोष्ट नसून भावना आहे. शब्द फार लहान आहे, पण शब्दाचा अर्थ फार मोठा आहे. काही लोकांनी त्यांचं प्रेम निभावलं, तर काहींना मात्र नशिबाची साथ मिळाली नाही… असंच काही झालं आहे बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत. माधुरी आज पती आणि डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत सुखी संसार करत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा माधुरी एका राजघराण्यातील मुलाच्या प्रेमात होती. पण अभिनेत्रीचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. कुटुंबियांचा विरोध आणि अन्य संकटांमुळे माधुरी हिची ‘लव्हस्टोरी’ अधुरी राहिली..

माधुरी हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीच्या नावाची चर्चा अनेक सेलिब्रिटींसोबत झाली. अनेक सेलिब्रिटी माधुरी हिच्या प्रेमात होते. पण माधुरीच्या मनावर मात्र माजी क्रिकेटर अजय जडेजा यांचं राज्य होतं. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट देखील केलं. पण नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही..

माधुरी आणि अजय यांची पहिली ओळख फोटोशूट दरम्यान झाली होती. पहिल्या नजरेत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांची केमिस्ट्री देखील चाहच्यांमध्ये चर्चेत होती. एवढंच नाही दोघांचे रोमाँटिक फोटो देखील चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत होते. दरम्यान, दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. सर्वकाही उत्तम सुरु असताना त्यांच्या नात्यात वाद होवू लागल्याची माहिती समोर आली. अजय जडेजा यांच्या क्रिकेट कामगिरीत मोठे नकारात्मक बदल झाले. शिवाय त्यांचं नातं तुटण्यामागे कुटुंबिय असल्याचं रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय जडेजा राजघराण्यातील होते. तर माधुरी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबातली. म्हणून अजयच्या कुटुंबीयांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. अशा परिस्थितीत माधुरी दीक्षितच्या कुटुंबीयांनी देखील त्यांच्या नात्याला विरोध केला. कुटुंबियांकडून नात्याला विरोध होत असताना अजय यांचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आलं…

अजय यांचं नाव मॅच फिक्सिंगमध्ये आल्यानंतर माधुरी यांच्या कुटुंबियांनी अजय जडेजा यांच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध केला. त्यानंतर माधुरी दीक्षित आणि अजय जडेजा यांचे मार्ग वेगळे झाले. खेर माधुरीने डॉ.श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि अमेरिकेत गेली. अनेक वर्षांनंतर माधुरी पुन्हा मुंबईमध्ये आली आहे. तर दुसरीकडे अजय जडेजा यांनी प्रसिद्ध राजकारणी जया जेटली यांची मुलगी आदिती जेटली यांच्यासोबत लग्न केलं.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.